Join us  

Sara Tendulkar IPL 2022: रोहित शर्माची तुफान फटेबाजी आणि सारा तेंडुलकरची रिअॅक्शन, फोटो व्हायरल

Sara Tendulkar IPL 2022: मंगळवारी मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना पाहण्यासाठी सारा तेंडुलकर स्टेडिअमवर पोहोचली होती. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:51 AM

Open in App

Sara Tendulkar IPL 2022:  इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात सामना रंगला होता. अतितटीच्या झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला. परंतु दोन्ही संघांच्या फलंदाजांची उत्तम फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने ४८ धावांची तुफान खेळी खेळली. रोहित शर्मानं तुफान फटकेबाजीही केली. यावेळी मैदानात मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या सारा तेंडुलकरची (Sara Tendulkar) रिअॅक्शनही व्हायरल झाली आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सामना पाहण्यासाठी पोहोचली होती. यावेळी बालकनीमध्ये उभी राहून ती मुंबई इंडियन्सला चिअर करत होती. जेव्हा रोहित शर्मानं जबरदस्त फलंदाजी करत षटकार ठोकला, त्यावेळी साराचाही आनंद गगनात मावेनासा झाला.

सारा तेंडुलकरची ही रिअॅक्शन टीव्ही स्क्रिनवर दिसली आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेक नेटकऱ्यांनी तिचे फोटो शेअरही केले आहेत. सारा यापूर्वीही अनेकदा मुंबई इंडियन्सचे सामने पाहण्यासाठी पोहोचली होती. मुंबई इंडियन्सची आता अखेरची लिग मॅच शिल्लक आहे. यामध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलंजात आहे. दिल्ली कॅपिटल्सविरोधातील हा सामना २१ मे रोजी खेळवला जाणार आबे. अखेरच्या सामन्यात नव्या खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचे संकेत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यानं दिले होते.

टॅग्स :सारा तेंडुलकररोहित शर्माअर्जुन तेंडुलकरमुंबई इंडियन्स
Open in App