क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाज अन् विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याने आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. सचिन तेंडुलकर याने खास कॅप्शनसह दोन फोटो शेअर करत आई बद्दल मनातील भावना व्यक्त केली आहे. निमित्त होतं ते म्हणजे रजनी तेंडुलकर यांचा वाढदिवस.
आईसाठी खास पोस्ट
क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या प्रवासात कुटुंबियांतील प्रत्येक सदस्याचे खास योगदान राहिले आहे. हा प्रवास आईच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हता, अशा आशयाची खास पोस्ट तेंडुलकरनं शेअर केली आहे. सचिन तेंडुलकरन जे दोन फोटो शेअर केले आहेत त्यात तो आईच्या अगदी बाजूला उभे असल्याचे दिसते. दुसऱ्या फोटोत सचिन आईला केक भरवताना दिसतो. खास कॅप्शनसह फोटो शेअर करताना सचिनने लिहिलंय की,
तुझ्या पोटी जन्माला आलो, म्हणून मी घडलोतुझा आशीर्वाद होताम्हणून मी प्रगती करत राहिलोतू खंबीर आहेस म्हणूनच आम्ही सगळे खंबीर राहिलोवाढदिवसाच्या शुभेच्छा आई!
खास फ्रेममध्ये पुन्हा दिसली तेंडुलकर कुटुंबियातील सूनबाई
सचिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये पुन्हा एकदा होणाऱ्या सूनबाईची झलक पाहायला मिळते. अर्जुन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आणि साराशिवाय सानिया चांडेक ही देखील तेंडुलकर फॅमिलीच्या खास कार्यक्रमात उपस्थितीत होती. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा नुकताच साखरपुडा झालाय. सचिन तेंडुलकरनं या गोष्टीची पुष्टीही केलीये. त्यानंतर सातत्याने होणारी सूनबाई सचिनने शेअर केलेल्या फोटोतील फ्रेममध्ये दिसली आहे. याआधी तेंडुलकरनं लेक साराच्या पीलेट्स स्टुडिओतील फोटो शेअर केले होते. त्यावेळीही सानिया तेंडुलकर कुटुंबियांसोबत दिसली होती.