Join us  

अर्जुन, साराचं अकाऊंट; सचिन तेंडुलकरनं ट्विटरकडे केली महत्त्वाची मागणी

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला सध्या मनस्ताप सहन करावा लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 2:15 PM

Open in App

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला सध्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. ट्विटरवर अर्जुन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांच्या नावाचं अकाऊंट आहे आणि त्यामुळे तेंडुलकरची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यामुळेच तेंडुलकरनं ट्विटर इंडियाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असलेला तेंडुलकर सतत पोस्ट करत असतो. पण, बुधवारी त्यानं केलेली पोस्ट ही ट्विटर इंडियाचे टेंशन वाढवणारी होती. त्यानं थेट ट्विटर इंडियाला अ‍ॅक्शन घेण्याची विनंती या पोस्टमधून केली. 

ट्विटरवर अर्जुन आणि सारा यांच्या नावानं अकाऊंट आहे, परंतु ते फेक असल्याचं तेंडुलकरनं बुधवारी स्पष्ट केलं. या दोन्ही अकाऊंटवरून विविध राजकीय पोस्टही केल्या गेल्या आणि त्याच्याशी माझ्या कुटुंबातील कोणाचाही काडीमात्र संबंध नाही, असं तेंडुलकरनं स्पष्ट केलं. अर्जुन आणि सारा यांचं ट्विटरवर अकाऊंट नसल्याचं सांगत त्यानं ट्विटर इंडियाकडे फेक अकाऊंट बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

त्यानं पोस्ट केली की,''मला हे स्पष्ट करायचे आहे की, माझा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांचे ट्विटरवर अकाऊंट नाही. अर्जुनच्या नावानं जे अकाऊंट आहे, ते बनावट आहे आणि त्याच्यावरून जाणीवपुर्वक वाद निर्माण होईल, असं ट्विट केलं गेलं. ट्विटर इंडियाला माझी विनंती आहे, की त्यांनी यावर कारवाई करावी.''   भारतीय खेळाडूंमधील संघ भावना हरवतेय; सचिन तेंडुलकरला चिंता, सौरव गांगुलीकडे विनंतीदुलीप चषक क्रिकेट स्पर्धेत सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत तेंडुलकरनं व्यक्त केलं. या स्पर्धेत खेळाडू सांघिक कामगिरीपेक्षा वैयक्तिक कामगिरीवर अधिक भर देताना पाहायला मिळत आहे आणि ही चिंतेची बाब असल्याचं तेंडुलकरनं म्हटलं. यामुळे खेळ भावना संपुष्टात येईल, अशी भीती त्यानं व्यक्त केली. पाच विभागांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सुधारणा करण्याची विनंती केली. तेंडुलकर म्हणाला,''गांगुलीनं गुलीप चषक स्पर्धेकडे लक्ष घालावे. या स्पर्धेत खेळाडू वैयक्तिक कामगिरीवर अधिक भर देतात.. येथे संघभावना दिसत नाही. हे सर्व आयपीएल लिलावासाठी किंवा आगामी ट्वेंटी-20/ वन डे स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून खेळ होते. त्यात संघाचा विचार होताना दिसत नाही.''

दुलीप चषक स्पर्धा पाच विभागीय संघांमध्ये खेळवली जाते, परंतु आता भारत ब्लू, भारत ग्रीन आणि भारत रेड अशा राऊंड रॉबीनमध्ये खेळवली जातात. येत्या रविवारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यात तेंडुलकर हा मुद्दा मांडणार आहे. ''क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे त्यात संघभावना, एकजुटता आलीच. हा एकट्या व्यक्तिचा खेळ नाही,'' असे तेंडुलकर म्हणाला. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरसारा तेंडुलकरट्विटर