Join us

सचिनने विचारले ४ प्रश्न; म्हणाला- या शब्दांना हिंदीत काय म्हणतात सांगा... पाहा तुम्हाला जमतंय का?

खरे क्रिकेटप्रेमी असाल तर तुम्हालाही येतील या प्रश्नांची उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 14:17 IST

Open in App

Sachin Tendulkar Hindi Diwas : एकीकडे जगभरातील भारतीय सोशल मीडियावर आपापल्या शैलीत हिंदी दिन साजरा करत आहेत, तर दुसरीकडे सचिन तेंडुलकरने या प्रसंगी एक पाऊल पुढे टाकत काही रंजक प्रश्न विचारले आहेत. ट्विटरवर एक पोस्ट करताना त्याने लिहिले आहे की- खालील क्रिकेट शब्दांना हिंदीत काय म्हणतात तुम्ही मला सांगू शकाल का? यासोबत त्याने चार शब्दही दिले आहे.

काय आहेत ते चार प्रश्न?

सचिन तेंडुलकरने त्याच्या ट्विटमध्ये अंपायर, विकेट-कीपर, फिल्डर आणि हेल्मेट असे चार शब्द दिले आहेत. या शब्दांना पर्यायी हिंदी शब्द कोणते, असा प्रश्न सचिनने चाहत्यांना विचारला आहे.

सचिनने विचारलेल्या प्रश्नांची लोकांनी मनोरंजक आणि मजेशीर उत्तरे दिली. सचिन तेंडुलकरची आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनेही यावर प्रयत्न केले. फ्रँचायझीने दिलेला प्रतिसाद खूपच मनोरंजक होता. फ्रेंचायझीने लिहिले-

  • क्रिकेट: गोलगट्टम लकड़ पट्टम दे दनादन प्रतियोगिता
  • बैट्समैन: बल्लेबाज
  • बॉलर: गेंदबाज
  • अंपायर: निर्णायक
  • विकेटकिपर: यष्टि-रक्षक
  • फील्डर: क्षेत्ररक्षक
  • हेलमेट: शीश कवच

याशिवाय, विशाल नावाच्या युजरने लांबलचक उत्तर देत आपले मत व्यक्त केले. त्याने लिहिले- सामान्यत: आपण हिंदीत फिल्डरला क्षेत्ररक्षक म्हणतो. बाकी सर्व शब्द त्याच प्रकारे वापरले जातात आणि ही हिंदी भाषेची खासियत आहे की ही भाषा मोठा मनाची आहे. ती इतर भाषांमधील शब्दही आनंदाने स्वीकारते. हा प्रकार क्लिष्ट नाही, उलट आपले जीवन सोपे करणे हा त्याचा उद्देश आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकरहिंदी