Join us  

सचिनला हवीय इंग्लंडच्या 'या' खेळाडूसारखी शरीरयष्टी, म्हणाला किती ऑम्लेट खावे लागतील?

sachin tendulkar : पीळदार शरीरयष्टी ठेवणं सध्याचा ट्रेंडच आहे. आता भारतीय संघाचा मास्टरब्लास्टर माजी फलंदाज सचिन तेंडुलकरलाही पीळदार शरीरयष्टी करण्याची इच्छा झालीय.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:46 PM

Open in App

पीळदार शरीरयष्टी ठेवणं सध्याचा ट्रेंडच आहे. आता भारतीय संघाचा मास्टरब्लास्टर माजी फलंदाज सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) पीळदार शरीरयष्टी करण्याची इच्छा झालीय. पण सचिनची ही इच्छा जागृत होण्यामागे इंग्लंडच्या एका माजी गोलंदाजाचा हात आहे. इंग्लंडचा ३९ वर्षीय माजी वेगवान गोलंदाज ख्रिस ट्रीमलेटची (Chris Tremlett) पीळदार शरीरयष्टी पाहून सचिन देखील खूप खूश झाला आहे. सचिननं ट्रीमलेटसोबतचा जिममध्ये ट्रेनिंग करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (Sachin Posted Photo With Chris Tremlett)

सचिननं ख्रिस ट्रीमलेटच्या शरीरयष्टीचं कौतुक तर केलंच. पण ट्रीमलेटसारखी शरीरयष्टी करण्यासाठी मला किती ऑम्लेट खावे लागतील?, अशी मिश्किल टिप्पणी देखील केली आहे. 

रायपूरमध्ये सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड टी-२० स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत सर्व देशांचे माजी खेळाडू पुन्हा एकदा मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत. सचिन आणि ट्रीमलेट रायपूरच्या ज्या हॉटेलमध्ये सध्या थांबले आहेत. त्याच हॉटेलमधील जीममध्ये दोघं एकत्रित व्यायाम करतात. जीम सेशनमध्ये सचिननं ट्रीमलेटसोबतचा फोटो शेअर केलाय. "ट्रीमलेट हा माझा सर्वकालीन हीरो असून ट्रेनिंग पार्टनर आहे", असंही सचिननं म्हटलंय. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय