सचिन तेंडुलकर अन् बिल गेट्सने गार्डनच्या बेंचवर बसून खाल्ला 'मुंबई स्पेशल वडा पाव' (VIDEO)

Sachin Tendulkar Bill Gates, Vada Pav Viral Video: कॉलेजमधील दोन मित्रांप्रमाणे अतिशय आरामात या दोघांनी वडा पावचा आस्वाद घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:05 IST2025-03-21T14:01:32+5:302025-03-21T14:05:56+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar and Bill Gates ate 'Mumbai Special Vada Pav' while sitting on a bench in the garden (VIDEO) | सचिन तेंडुलकर अन् बिल गेट्सने गार्डनच्या बेंचवर बसून खाल्ला 'मुंबई स्पेशल वडा पाव' (VIDEO)

सचिन तेंडुलकर अन् बिल गेट्सने गार्डनच्या बेंचवर बसून खाल्ला 'मुंबई स्पेशल वडा पाव' (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sachin Tendulkar Bill Gates, Vada Pav Viral Video: भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स या दोन व्यक्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय लोकप्रिय आहेत. सचिनने क्रिकेट जगतात नावलौकिक मिळवला तर बिल गेट्स यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. अशा दोन कर्तृत्ववान व्यक्ती मुंबईत एका बेंचवर बसून वडापाव खात बसले होते असं सांगितलं तर कुणाला विश्वास बसेल. पण असं खरंच घडलं. नुकतेच बिल गेट्स भारत दौऱ्यावर आलेत. त्यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर सोबत संवाद साधला आणि 'स्नॅक ब्रेक' मध्ये चक्क मुंबईच्या वडापावचा आस्वाद घेतला. सचिनने स्वत: यासंबंधी व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली आहे.

सचिन तेंडुलकर नेहमीच मुंबईतील वडापावचा फॅन आहे. त्याला वडापाव खूप आवडतो हे देखील सर्वज्ञात आहे. तशातच मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स मुंबईत आले होते. त्यावेळी सचिन आणि बिल गेट्स यांची भेट झाली. या भेटीदरम्यान, त्यांनी फॉर्मल गप्पा गोष्टी केल्या. त्याशिवाय त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. या सोबतच त्यांनी स्नॅक ब्रेक घेतला. या ब्रेकमध्ये या दोघांनी वडा पावचा नाश्ता केला. मुंबईचा वडापाव खाताना दोघांच्या चेहऱ्यावर विलक्षण तृप्तीचा भाव दिसत होता. पाहा व्हिडीओ-


दरम्यान, सचिन तेंडुलकर आणि बिल गेट्सचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर अनेक नेटकरी व्यक्त होत आहेत.

Web Title: Sachin Tendulkar and Bill Gates ate 'Mumbai Special Vada Pav' while sitting on a bench in the garden (VIDEO)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.