धोनीच्या पाठिशी उभा राहिला सचिन; निवृत्तीबाबत केलं हे वक्तव्य

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने संथ खेळ केला आणि त्यांनंतर त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. पण या बाबतीत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर मात्र, धोनीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 19:48 IST2018-07-22T19:46:16+5:302018-07-22T19:48:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sachin stands out for Dhoni; Statements made about his retirement | धोनीच्या पाठिशी उभा राहिला सचिन; निवृत्तीबाबत केलं हे वक्तव्य

धोनीच्या पाठिशी उभा राहिला सचिन; निवृत्तीबाबत केलं हे वक्तव्य

ठळक मुद्देसचिनच्या या वक्तव्यामधून, कुणीही धोनीला निवृत्तीचा सल्ला देऊ नये, असा संदेश मिळत आहेत.

मुंबई : भारतीय क्रिकेट वर्तुळामध्ये सध्याच्या घडीला महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घ्यावी किंवा नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने संथ खेळ केला आणि त्यांनंतर त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. पण या बाबतीत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर मात्र, धोनीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे.

एका मुलाखतीमध्ये सचिनला धोनीने निवृत्ती घ्यावी की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना सचिन म्हणाला की, " निवृत्ती कधी घ्यायची, हा निर्णय त्या खेळाडूनेच घ्यायचा असतो. कारण प्रत्येक खेळाडूला आपला फिटनेस माहिती असतो. त्याचबरोबर आपण किती काळ खेळू शकतो, हेदेखील ठाऊक असते. त्यामुळे निवृत्त व्हायचे की नाही, हा निर्णय धोनीने स्वत:हून घ्यायला हवा."

सध्याच्या घडीला बरीचं जण धोनीला निवृत्तीचे सल्ले देत आहेत. त्या सर्वांना सचिनने चपराक लगावली आहे. त्याच्या या वक्तव्यामधून, कुणीही धोनीला निवृत्तीचा सल्ला देऊ नये, असा संदेश मिळत आहेत.

सचिन धोनीबाबत म्हणाला की, " आतापर्यंत धोनीने फार चांगले क्रिकेट खेळले आहे. त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हे धोनीचा चांगलेच माहिती आहे. त्यामुळे निवृत्तीबाबत धोनी योग्यवेळी निर्णय घेईल.निवृत्तीचा निर्णय सर्वांनी धोनीवर सोडायला हवा. " 

Web Title: Sachin stands out for Dhoni; Statements made about his retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.