Join us
Daily Top 2Weekly Top 5

हसीच्या सर्वोत्तम प्रतिस्पर्धी संघात सचिन, कोहली, सेहवागला स्थान

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसी याने बुधवारी आपल्या सर्वोत्तम प्रतिस्पर्धी जागतिक कसोटी संघाची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 03:50 IST

Open in App

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसी याने बुधवारी आपल्या सर्वोत्तम प्रतिस्पर्धी जागतिक कसोटी संघाची घोषणा केली. यामध्ये त्याने भारताचा विध्वंसक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली यांना स्थान दिले.आॅस्टेÑलियाकडून २००५ ते २०१३ दरम्यान कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या हसीने अशा खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले, ज्यांच्याविरुद्ध तो खेळला आहे. त्याने आपल्या संघात सलामीवीराची जबाबदारी सेहवाग आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांच्यावर सोपविली आहे. मधल्या फळीत वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, द. आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांना स्थान दिले आहे.त्याचप्रमाणे गोलंदाजी आक्रमणात हसीने द. आफ्रिकेच्या डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल यांच्यासह इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांना स्थान दिले आहे. आपल्या संघाविषयी हसी म्हणाला की, ‘मला संगकारा, महेंद्रसिंग धोनी आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यावर खूप विचार करावा लागला. पण माझ्या मते धोनी आणि डिव्हिलियर्स यांनी मर्यादित षटकांमध्ये अधिक प्रभाव पाडला आहे. संगकारा कसोटीमध्ये अधिक प्रभावी ठरला आहे.’>हसीचा सर्वोत्तम प्रतिस्पर्धी कसोटी संघ : वीरेंद्र सेहवाग, ग्रॅमी स्मिथ, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, जॅक कॅलिस, कुमार संगाकारा, डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल, जेम्स अँडरसन आणि मुथय्या मुरलीधरन.