Join us  

SA vs PAK : बाबर आझमनं मोडला विराट कोहलीचा विक्रम; रमीझ राजा म्हणतात, म्हणून पाकिस्तान संघाला जगभरात डिमांड!

South Africa vs Pakistan, 1st ODI : पाकिस्तानने अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरलेल्या वन डे सामन्यात द. आफ्रिकेवर तीन विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 10:49 AM

Open in App

South Africa vs Pakistan, 1st ODI : पाकिस्तानने अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरलेल्या वन डे सामन्यात द. आफ्रिकेवर तीन विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानला अखेरच्या षटकात सहा चेंडूत तीन धावांची गरज होती. फेलुकवायोने फहीम अश्रफला पहिले चार चेंडू निर्धाव टाकताच पाकच्या तंबूत अनिश्चितता पसरली होती. अखेर फहीमनेच पाचव्या चेंडूवर दोन धावा करीत बरोबरी साधून दिली. अखेरच्या चेंडूवर त्याने एक धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीझ राजा ( Ramiz Raja) यांनी या रोमहर्षक सामन्यानंतर मोठं विधान केलं. IPL मधील फलंदाजांचे १० मोठे विक्रम; ५ हजार धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह फलंदाजांत ४ भारतीय, ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक पराक्रम

द. आफ्रिकेच्या ५० षटकातील ६ बाद २७३ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकने ७ बाद २७४ धावा करीत सामना जिंकला. कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) याने १०४ चेंडूत १७ चौकारांसह १०३ तसेच सलामीवीर इमाम उल हक याने ७० धावा केल्या. मधल्या फळीत रिझवान (४०)आणि शादाब खान (३३) यांनीदेखील महत्त्वाचे योगदान दिले. एन्रिच नॉर्खियाने ५१ धावा देत सर्वधिक चार गडी बाद केले.  आफ्रिकेच्या व्हॅन डेर ड्युसेनच्या १३४ चेंडूतील दहा चौकार आणि दोन षटकारांसह १२३ धावांच्या जोरावर द. आफ्रिकेने आव्हानात्मक मजल गाठली होती. डेव्हिड मिलर ५०, फेलुकवायो २९ आणि क्विंटन डिकॉकने २० धावा करीत धावसंख्येला आकार दिला. पाककडून शाहीन आफ्रिदी आणि रौफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. IPL 2021 : Big News : KKRच्या नितीश राणानंतर 'वानखेडे'वरील आता ८ जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह

या सामन्यानंतर रमीझ राजा म्हणाले की,''सोपी गोष्ट अवघड करण्याची आम्हाला सवयच आहे. त्यामुळेच आम्हाला जगभरात डिमांड आहे. सामना कसा रोमहर्षक बनवायचा हे आम्हाला चांगलं माहित्येय.''

दुसऱ्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी ( Highest 2nd wicket partnership for Pakistan in an ODI chase)

  1. १७७ धावा - बाबर आझम व इमाम-उल-हक वि. दक्षिण आफ्रिका, शुक्रवारी
  2. १७० धावा - मुसाद्दार नाझर वि. झहीर अब्बास वि. भारत, १९८३
  3. १६७ धावा - रमीझ राजा वि. सलीम मलिक वि. इंग्लंड, १९८७

 

पहिल्या ७६ वन डे डावांत सर्वाधिक धावा ( Most runs in first 76 ODI innings)

  1. हाशिम आमला - ३७३४
  2. बाबर आझम - ३६८३
  3. शे होप - ३५४७
  4. विव्ह रिचर्ड्स - ३५०२
  5. केन विलियम्सन - ३२६९

 

सर्वात जलद १३ वन डे शतकं ( डाव) ( Quickest to complete 13 ODI tons (By innings))

  1. बाबर आझम - ७६ डाव
  2. हाशिम आमला - ८३
  3. विराट कोहली - ८६ 
  4. क्विंटन डी कॉक - ८६ 
टॅग्स :पाकिस्तानद. आफ्रिकाविराट कोहली