सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान : दुखापतीमुळे आतंरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेनने जोरदार पुनरागमन केले. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फखर झमानची विकेट घेताच स्टेनने विक्रम नावावर केला. कसोटी कारकिर्दीतले त्याचा हा 422 वा बळी ठरला आणि यासह आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्याने पटकावला. त्याने शॉन पोलॉकचा विक्रम मोडला. 35 वर्षीय स्टेनने हा पल्ला गाठण्यासाठी 89 सामने खेळले. पोलॉकने 108 कसोटी सामन्यांत 421 विकेट घेतल्या.
स्टेनचे आणखी काही विक्रमएका डावात सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्या आफ्रिकेच्या गोलंदाजांमध्ये स्टेन अव्वल स्थानावर आहे. त्याने 26 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. अॅलन डोनाल्डने पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम 20 वेळा केला आहे.दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक पाच वेळा कसोटीत दहा विकेट घेण्याचा विक्रमही स्टेनच्या नावावर आहे. कागिसो रबाडाने चार वेळा ही कामगिरी केली आहेसेंच्युरियन स्टेडियमवर त्याने सर्वाधिक 56 विकेट घेतल्या आहेत. मकाया एनटीनीने या स्टेडियमवर 54 विकेट घेतल्या आहेत.