Join us  

IPL 2021: फिक्सिंगच्या आरोपांबाबत श्रीशांत पुन्हा बोलला, म्हणाला... १० लाखांसाठी मी असं का करेन?

IPL 2021: 'मी जेव्हा एक पार्टी करतो तेव्हाच दोन-दोन लाखांचं बिल होतं. मग मी १० लाखांचं असं काम का करेन?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 2:19 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये २०१३ साली समोर आलेल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरण आता शांत झालं आहे. याप्रकरणात वेगवान गोलंदाज एस.श्रीशांत याला शिक्षा देखील भोगावी लागली होती. त्याची मुक्तता देखील झाली आहे आणि त्याच्यावरील बंदी देखील मागे घेण्यात आली. श्रीशांत आता पुन्हा क्रिकेट खेळू शकतो. पण याच दरम्यान श्रीशांतनं नुकतीच स्पोर्ट्स किडाला दिलेल्या मुलाखतीत मोठा दावा केला आहे. या मुलाखतीत श्रीशांतनं २०१३ सालच्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावर दिलखुलास चर्चा केली. 

फॉर्म अन् फिटनेसवरील टीकेला हार्दिक पंड्याचं प्रत्युत्तर, करुन दिली पंजाब विरुद्धच्या 'त्या' सामन्याची आठवण

आपल्यावर करण्यात आलेले आरोप त्यावेळी माझा मृत्यू झाल्यासारखेच होते. तसंच केवळ १० लाख रुपयांसाठी असा निर्णय का घेईन असंही श्रीशांत म्हणला आहे. "मी जेव्हा एक पार्टी करतो तेव्हाच दोन-दोन लाखांचं बिल होतं. मग मी १० लाखांचं असं काम का करेन? मी या प्रकरणातून मुक्त होण्यामागे माझ्या पाठिशी उभं राहिलेल्या सर्वांचं आणि माझ्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळेच मी इथं उभा आहे", असं श्रीशांत म्हणाला. 

'महेंद्रसिंग धोनी आयपीएलनंतर मैदानात दिसणार नाही, संन्यास घेणार'

आयपीएलमध्ये २०१३ साली समोर आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सच्या काही खेळाडूंची नावं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकरणात श्रीशांतचं नाव त्यावेळी समोर आलं होतं. त्यानंतर श्रीशांतला बंदीला सामोरं जावं लागलं. तसंच तुरुंगवास देखील भोगावा लागला. आता त्याची सर्व आरोपांतून मुक्तता झाली असून त्याच्यावरील बंदी देखील मागे घेण्यात आली आहे. श्रीशांत सध्या केरळ आणि स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्येही खेळताना दिसून येतो. 

नेमकं काय म्हणाला श्रीशांत?"मला वाटतं ही पहिलीच वेळ असेल की मी स्पॉट फिक्सिंग संदर्भात सविस्तर बोलत आहे. सामन्यात ६ चेंडूमध्ये १४ पेक्षा अधिक धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूंवर मी फक्त ५ धावा दिल्या होत्या. यात एकही नो बॉल किंवा वाइड चेंडू टाकला नव्हता. इतकंच काय तर एकही चेंडू स्लोवर वन देखील टाकला नव्हता. पायावर १२ सर्जरी झालेल्या असूनही मी १३० किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी करत होतो. त्यावेळी मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी देखील तयारी करत होतो. या दौऱ्यासाठी माझी निवड होईल हेच माझं लक्ष्य होतं. मी मोठेपणा सांगत नाही, पण मी जेव्हा पार्टी करतो तेव्हा एकावेळेचे माझं बिल २ लाखांपर्यंत होतं. मग फक्त १० लाखांसाठी मी असं काम का करेन?", असं श्रीशांत म्हणाला. 

आरोपांमधून माझी मुक्तता होऊन मी मैदानात परतलो असलो तरी या घटनेमुळे मी नैराश्यात गेलो होतो. माझ्या वैयक्तिक आयुष्याचं खूप मोठं नुकसान झालं, असंही तो म्हणाला. "एखद्यावर आरोप करणं खूप सोपं असतं. पण त्या घटनेनं माझ्यासह संपूर्ण कुटुंबानं, माझे नातेवाईक आणि मित्रांना खूप वाईट काळाचा सामना करावा लागला. त्यावेळीचा अनुभव माझ्यासाठी मृत्यू झाल्यासारखाच होता", असं श्रीशांत म्हणाला. 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्स
Open in App