IPL 2021: फॉर्म अन् फिटनेसवरील टीकेला हार्दिक पंड्याचं प्रत्युत्तर, करुन दिली पंजाब विरुद्धच्या 'त्या' सामन्याची आठवण

IPL 2021, MI vs PBKS: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 01:13 PM2021-09-28T13:13:24+5:302021-09-28T13:14:47+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 Hardik pandya reliving memories from his powerful knock against PBKS a year ago | IPL 2021: फॉर्म अन् फिटनेसवरील टीकेला हार्दिक पंड्याचं प्रत्युत्तर, करुन दिली पंजाब विरुद्धच्या 'त्या' सामन्याची आठवण

IPL 2021: फॉर्म अन् फिटनेसवरील टीकेला हार्दिक पंड्याचं प्रत्युत्तर, करुन दिली पंजाब विरुद्धच्या 'त्या' सामन्याची आठवण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, MI vs PBKS: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या टप्प्यात मुंबई इंडियन्सला अद्याप एकाही सामन्यात विजय प्राप्त करता आलेला नाही. प्ले ऑफमधील आपली दावेदारी टिकवून ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला आजचा सामना जिंकावा लागणार आहे. 

डेव्हिड वॉर्नर मैदानात न येता हॉटेलमध्येच का थांबला?, प्रशिक्षकांनी सांगितलं खरं कारण...

मुंबई इंडियन्सच्या संघातील मधल्या फळीच्या फॉर्मबाबत टीका होताना दिसत आहे. त्यात पहिल्या  दोन सामन्यांत अष्टपैलू हार्दिक पंड्याला बाहेर बसवण्यात आलं होतं. तर तिसऱ्या सामन्यात हार्दिक स्वस्तात बाद झाला होता. त्यामुळे हार्दिकच्या फॉर्म अन् फिटनेसबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट नसल्यानं आगामी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी देखील भारतीय संघासमोर मोठी चिंता निर्माण झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्याच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरचा समावेश केला जाणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. 

'महेंद्रसिंग धोनी आयपीएलनंतर मैदानात दिसणार नाही, संन्यास घेणार'

मुंबई इंडियन्सनं आज हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात हार्दिक पंड्या त्याच्या भूमिकेबाबत आणि वर्षभरापूर्वी यूएईमध्येच पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात साकारलेल्या दमदार खेळीची आठवण करुन दिली आहे. 

"जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता तेव्हा तुम्ही एकटे असता. तुमच्यासमोर इतर ११ खेळाडू तुम्हाला रोखण्यासाठी तयार असतात. पण तुम्हाला मैदानात बॉस प्रमाणेच वावरावं लागतं. तुमच्याबद्दल भीती प्रतिस्पर्ध्यांना निर्माण व्हायला हवी. आता तुम्ही नेमकं काय करणार? कोणता फटका मारणार याची भीती निर्माण झाली पाहिजे असा तुमचा अॅटिट्यूड मैदानात असायला हवा", असं हार्दिक पंड्या म्हणाला. 

गेल्या वर्षी १ ऑक्टोबर रोजी अबूधाबीच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला होता. या सामन्याच्या आठवणी हार्दिकनं यावेळी ताज्या केल्या. "मी त्यावेळी चांगला खेळत होतो. पण मी चांगल्या पद्धतीनं सामना संपवू शकत नव्हतो. सामन्यात रोहित आणि पोलार्डनं त्यांचं काम केलं होतं. त्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळालं. मी ठरवलं मैदानात जाऊन फक्त आपला नैसर्गिक खेळ करायचाय आणि आनंद घ्यायचा. जेव्हा मी पहिला षटकार ठोकला त्यात इतका जोर होता की माझं संपूर्ण शरीर खऱ्या अर्थान त्यावेळी पूर्णपणे मोकळं झालं. त्यानंतर मला आणखी मोठे फटके मारण्याची ताकद मिळाली. आजचाच तो दिवस आहे की जिथं तुला कायतरी चांगलं करायंचंय हे लक्षात आलं आमि मी बेफाम होऊन खेळलो", असं हार्दिक पंड्या म्हणाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्जवर तब्बल ४८ धावांनी विजय प्राप्त केला होता. 

Web Title: ipl 2021 Hardik pandya reliving memories from his powerful knock against PBKS a year ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.