Join us

S. Africa Vs Srilanka Test : द. आफ्रिकेचा लाजीरवाणा पराभव, तीन दिवसांत श्रीलंकेची बाजी

श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला लाजीरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 73 धावांत गुंडाळून 278 धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 18:14 IST

Open in App

कोलंबो - श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला लाजीरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 73 धावांत गुंडाळून 278 धावांनी विजय मिळवला. कसोटी क्रिकेटमधील आफ्रिकेची ही निच्चांक धावसंख्या राहीली. याआधी 2015च्या कसोटीत भारताने त्यांचा डाव 79 धावांत गुंडाळला होता.   विजयासाठी 352 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांना रंगना हेरथ आणि दिलरूवन परेरा यांनी स्वस्तात गुंडाळले. एडन मार्कराम (19) आणि व्हेर्नोन फिलेंडर (22*) वगळता आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आलेला नाही. ऑफस्पिनर परेराने या सामन्यात एकूण 78 धावांत 10 विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने दुस-या डावात 32 धावा देत आफ्रिकेच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. हेरथने 38 धावांत 3 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेच्या डावातील 287 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला 126 धावा करता आल्या होत्या. श्रीलंकेचा दुसरा डाव 190 धावांवर गडगडला. मात्र 351 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 

टॅग्स :क्रिकेटश्रीलंकाद. आफ्रिकाक्रीडा