Join us

स्मिथला धावबाद करणे माझे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण - जडेजा

स्मिथ हा अखेरचा फलंदाज जो हेजलवूडच्या सोबतीने प्रत्येक चेंडू फटकाविण्याच्या इराद्याने खेळत होता. त्याचवेळी जडेजाचा थ्रो थेट यष्टीवर आदळताच त्याच्या खेळीचा अंत झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 04:53 IST

Open in App

सिडनी : अष्टपैलू रवींद्र जडेजा याने तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी शतकवीर स्टीव्ह स्मिथ याला अलगद फेकीवर सुरेख झेलबाद केले. माझी ही कामगिरी वारंवार पाहण्यासारखी असल्याचे सांगून क्षेत्ररक्षणातील स्वत:ची सर्वोत्कृष्ट कामगिरी संबोधले आहे. स्मिथ हा अखेरचा फलंदाज जो हेजलवूडच्या सोबतीने प्रत्येक चेंडू फटकाविण्याच्या इराद्याने खेळत होता. त्याचवेळी जडेजाचा थ्रो थेट यष्टीवर आदळताच त्याच्या खेळीचा अंत झाला. डीप स्क्वेअर लेगवरून झेपावत जडेजाने चेंडू थेट यष्टीच्या दिशेने भिरकावला होता.

हा क्षण वारंवार पाहणे पसंत असेल का, असे विचारताच जडेजा म्हणाला, ‘ही माझी सर्वोत्कृष्ट कामगिरी असल्याने वारंवार पहायला आवडेल. ३० यार्डबाहेरून चेंडू थेट यष्टीच्या दिशेने भिरकावणे हा क्षण वेगळा आनंद देणारा आहे.’ ‘तीन किंवा चार गडी बाद करणे नेहमीचेच आहे. धावबादचा हा क्षण मात्र नेहमी स्मरणात असेल, असे सौराष्ट्रच्या या खेळाडूचे मत आहे.

या दौऱ्यात जडेजाचे क्षेत्ररक्षण उत्स्फूर्त आणि चपळ राहिले आहे. त्याने काही शानदार झेलदेखील घेतले. एमसीजीवर वेगवान धाव घेत मॅथ्यू वेडचा घेतलेला झेल अनेकांच्या स्मरणात राहावा, असा होता. शुक्रवारी मोक्याच्या क्षणी स्मिथला बाद करणे महत्त्वपूर्ण ठरले, अन्यथा आणखी ३० ते ४० धावांची भर पडणे शक्य होते.

वेग बदलण्याची योजना होतीसिडनीच्या खेळपट्टीवर चेंडू वळण घेत नसल्यामुळे वारंवार वेग बदलणे आणि विशिष्ट कोनातून (ॲंगल) गोलंदाजी करण्याची योजना होती. प्रत्येक षटकात गडी बाद करण्याची संधी मिळेल, अशी ही खेळपट्टी नव्हती. आमची योजना दडपण आणण्याची असल्याने सारख्या वेगाने गोलंदाजी करणे योग्य नव्हते. माझे लक्ष्य नेहमी अष्टपैलू कामगिरी हेच असल्याचे मत रवींद्र जडेजाने व्यक्त केले. ‘मैदानावर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात योगदान देण्याचे मनसुबे असतात. मला संधी मिळाली त्या त्या वेळी योगदान दिले. भारताबाहेर माझी फलंदाजी बहरली. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजा