RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा दुसरा फायनलिस्ट आज ठरेल. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर क्वालिफायर २ लढत होत आहे. क्वालिफायर १ मध्ये पराभूत झाल्याने SRH ला फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याची दुसरी संधी आहे, तर RR ने एलिमिनेटर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर मात करून इथवर मजल मारली. यजमान CSK खेळत नसल्याने चेपॉकचे स्टेडियम तितके भरलेले दिसत नाही. RRने नाणेफेक जिंकून SRHला प्रथम फलंदाजीला बोलावले. RR ने विजयी संघ कायम ठेवला आहे, तर हैदराबादने एडन मार्कराम व जयदेव उनाडकट अशा दोन सीनियर खेळाडूंना संघात पुन्हा बोलावले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर क्वालिफायर २ लढत होत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 20:10 IST