IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद

टॉसनंतर पावसाची बॅटिंग, सामना सुरु होण्यास आणखी विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 20:38 IST2026-04-10T20:31:34+5:302026-04-10T20:38:13+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
RR vs RCB Live Score IPL 2026 Rajasthan Royals captain Riyan Parag wins toss opts to field vs Royal Challengers Bengaluru Heavy Rain And Josh Hazlewood Return | IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद

IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru, 16th Match : गुवाहटीच्या बरसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील १६ वा सामना खेळवण्यात येत आहे. पावसाच्या बॅटिंगमुळे दोन्ही संघातील नाणेफेक अर्धा तास उशीराने झाला. सलग तीन विजयासह यंदाच्या हंगामात दमदार सुरुवात करणाऱ्या राजस्थानच्या संघाचा कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा पावसाने बॅटिंग सुरु केल्याचे पाहायला मिळाले.  पावसाच्या खेळामुळे  ८ वाजून १५ मिनिटांनी सुरु होणारा सामना सुरु होण्याची वेळ पुन्हा बदलली. ८ वाजून ४० मिनिटांनी या सामन्यातील पहिला चेंडू टाकणं अपेक्षित आहे.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

RR नं तुषार देशपांडेला दिली विश्रांती; RCB चा मॅच विनर खेळाडू परतला

हुषारीनं गोलंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडेच्या जागी RR च्या संघाने या सामन्यात बृजेश शर्माला संधी दिली आहे. दुसरीकडे बंगळुरुच्या ताफ्यात मॅच विनर गोलंदाज परतल्याचा आनंद आहे. दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्याला मुकलेल्या जोश हेजलवूड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. जेकब डफीच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. 

LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन 

यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक फलंदाज), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, ब्रिजेश शर्मा

  • राजस्थान रॉयल्स इम्पॅक्ट प्लेयर: वैभव सूर्यवंशी, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, शुभम दुबे, तुषार देशपांडे


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन  

विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक फलंदाज), टीम डेविड,रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जोश हेजलवुड

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर - सुयश शर्मा, जेकब बेथेल, रसिक सलाम दार, कनिष्क चौहान, व्यंकटेश अय्यर

Web Title : RR ने होशियार गेंदबाज को बेंच पर बिठाया; RCB में मैच विनर की वापसी का आनंद।

Web Summary : आरआर ने आरसीबी के खिलाफ मैच में पहले गेंदबाजी करने का फैसला किया, तुषार देशपांडे को विश्राम दिया। जोश हेजलवुड जैकब डफी की जगह आरसीबी की टीम में लौटे, जिससे उनका गेंदबाजी आक्रमण मजबूत हुआ।

Web Title : RR bench smart bowler; RCB welcomes back match-winner with joy.

Web Summary : RR chose to bowl first in the match against RCB, resting Tushar Deshpande. Josh Hazlewood returns to RCB's lineup, replacing Jacob Duffy, boosting their bowling attack.