Join us  

RR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगडे संघ भिडत आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: September 27, 2020 8:05 PM

Open in App

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगडे संघ भिडत आहेत. RRकर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith)ने नाणेफेक जिंकून KXIPला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. RRने आजच्या संघात दोन बदल केले  आहेत. त्यांनी यशस्वी जैस्वाल ( Yashashwi Jaiswal) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) यांच्या जागी जोस बटलर ( Jose Buttler) आणि अंकित राजपूत ( Ankit Rajpoot) यांना संधी दिली. KXIPनं आजच्या सामन्यात कोणताच बदल केला नाही, त्यामुळे सलग तिसऱ्या सामन्यात ख्रिस गेलला ( Chris Gayle) अंतिम 11 खेळाडूंबाहेर ठेवण्यात आले. RR vs KXIP Latest News & Live Score

लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी KXIPला दमदार सुरुवात करून दिली. जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 60 धावा चोपल्या. यंदाच्या IPL 2020मधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली.RR vs KXIP Latest News & Live Score

Highest Powerplay score in #IPL202060/0 किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स, शारजाह59/1 मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, अबु धाबी54/1 राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, शारजाह53/0 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, दुबई 53/0 चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान ऱॉयल्स, शाहजाह 

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्स