Join us

IPL 2021: अनुभव असूनही संघात नव्हता, आज संधी मिळाली अन् त्यानं दाखवून दिलं; दिल्लीला दिले धक्के!

IPL 2021: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 20:18 IST

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार संजू सॅमसननं घेतलेला निर्णय संघाचा अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकट यानं योग्य असल्याचं सिद्ध करुन दाखवत जबरदस्त पुनरागमन केलं आहे. 

राजस्थानच्या संघात धाकड फलंदाजाचं पुनरागमन, दिल्लीनंही आणलं घातक अस्त्र; जाणून घ्या Playing XI

डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटनं दिल्ली कॅपिटल्सला पावर प्लेमध्येत तीन मोठे धक्के दिले आहेत. जयदेव उनाडकट यानं दिल्लीच्या पृथ्वी शॉ (५), शिखर धवन (९) आणि अजिंक्य रहाणे (८) या तीन महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं आहे. 

जयदेव उनाडकटनं आपल्या पहिल्याच चेंडूवर कामालिचा स्विंग करत आपले मनसुबे स्पष्ट केले. राजस्थानच्या याआधीच्या सामन्यात जयदेव उनाडकटला संघात समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. आयपीएलचा चांगला अनुभव असतानाही उनाडकटला बाहेर बसविल्यानं क्रिकेट वर्तुळात चर्चाही झाली. पण दुसऱ्या सामन्यात जयदेव उनाडकटला संघात जागा मिळाली आणि त्यानं स्वत:ची निवड सिद्ध करुन दाखवली आहे. 

जयदेवनं मिळवलेल्या तीन विकेट्समुळे राजस्थानच्या संघानं दिल्ली कॅपिटल्सवर चांगलाच दबाव निर्माण केला आहे. राजस्थान रॉयल्स संघानं सामन्यात चांगली पकड निर्माण केली आहे. दिल्लीची पावर प्लेच्या पहिल्या ६ षटकांच्या अखेरीस ३ बाद ३६ अशी केविलवाणी अवस्था झाली आहे.  

टॅग्स :राजस्थान रॉयल्सआयपीएल २०२१