Join us

IPL 2023 Retention: RCBने घातक फलंदाजाला केलं बाहेर; कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी केली जाहीर 

आगामी २०२३च्या आयपीएल हंगामासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 19:00 IST

Open in App

मुंबई : आगामी २०२३च्या आयपीएल हंगामासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. खरं तर २०२३च्या आयपीएल हंगामात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. कारण काही संघानी स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, तर काही विदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) फ्रँचायझीने कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे आरसीबीने शेरफेन रदरफोर्डला संघातून बाहेर केले आहे.

आरसीबीने रिलीज केलेले खेळाडू - जेसन बेहरेनडॉर्फ, अनिश्‍वर गौतम, चामा मिलिंद, लवनीथ सिसोदिया, शेरफेन रदरफोर्ड. 

आरसीबीचा सध्याचा संघ - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन लेन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोम, महिपाल लोम सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.  आरसीबीकडे आता आयपीएल २०२३च्या लिलावासाठी ८.७५ कोटींची रक्कम शिल्लक आहे. वेस्ट इंडिजच्या संघाचा घातक फलंदाज शेरफेन रदरफोर्डला आरसीबीच्या फ्रँचायझीने रिलीज केले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीग्लेन मॅक्सवेलआयपीएल लिलाव 2020आयपीएल २०२२
Open in App