'रोज पारो बदलता है...'; हार्दिक पांड्या-माहिकाच्या रिलेशनशिपबद्दल काय बोलून बसला आशिष नेहरा

Hardik Pandya Mahieka Sharma Ashish Nehra: हरभजन सिंगच्या पॉडकास्टमध्ये नेहरा गप्पा-गोष्टी करत होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:36 IST2026-02-09T16:34:57+5:302026-02-09T16:36:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Roj Paro Badalta Hai Ashish Nehra spoke about Hardik Pandya Mahieka Sharma relationship | 'रोज पारो बदलता है...'; हार्दिक पांड्या-माहिकाच्या रिलेशनशिपबद्दल काय बोलून बसला आशिष नेहरा

'रोज पारो बदलता है...'; हार्दिक पांड्या-माहिकाच्या रिलेशनशिपबद्दल काय बोलून बसला आशिष नेहरा

Hardik Pandya Mahieka Sharma Ashish Nehra: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशीष नेहरा याने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये हार्दिकच्या रिलेशनशिपबाबत केलेल्या विनोदी वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

नेमका काय घडला प्रकार?

नेहराने हरभजन सिंहसोबत ‘हू इज द बॉस?’ या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमादरम्यान क्रिकेटपटूंना चित्रपटांच्या नावांशी जोडण्याचा एक खेळ खेळण्यात आला. ‘देवदास’ या चित्रपटाचे नाव समोर आल्यानंतर हरभजन सिंह यांनी हार्दिक पांड्याचे नाव घेतले. त्यावर नेहराने मिश्कील टिप्पणी करत हार्दिकच्या प्रेमसंबंधांवर टोला लगावला. नेहरा म्हणाला की, हार्दिक 'दररोज पारो बदलतो'. त्याच्या अशा वक्तव्याने हशा पिकला. हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात चढ-उतार

हार्दिक पांड्याचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही वर्षांत चढ-उतारांनी भरलेले आहे. त्याने २०२० मध्ये अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकसोबत विवाह केला होता. मात्र २०२४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर हार्दिकचे नाव ब्रिटिश गायिका जॅस्मिन वालिया हिच्यासोबत जोडले गेले. पुढे ऑक्टोबर महिन्यात हार्दिकने अभिनेत्री माहिका शर्मा हिच्यासोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर नेहराचे हे विधान होते. हे विधान अतिशय विनोदी भावनेने करण्यात आल्याने, त्यावर कोणताही गदारोळ झाला नाही.

दरम्यान, नेहरा यांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात आणि चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले असून हार्दिक पांड्या पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Web Title : हार्दिक पांड्या के रिश्तों पर आशीष नेहरा की टिप्पणी से चर्चा छिड़ी।

Web Summary : आशीष नेहरा की हार्दिक पांड्या के रिश्तों पर एक पॉडकास्ट में की गई मजाकिया टिप्पणी वायरल हो गई। उन्होंने मजाक में कहा कि पांड्या हर दिन अपनी 'पारो' बदलते हैं, पांड्या के पिछले रिश्तों और नताशा स्टेनकोविक से तलाक के बाद माहिका शर्मा के साथ हालिया घोषणा का जिक्र किया। इस टिप्पणी ने प्रशंसकों के बीच हल्की-फुल्की चर्चा छेड़ दी।

Web Title : Ashish Nehra's comment on Hardik Pandya's relationships sparks discussion.

Web Summary : Ashish Nehra's humorous comment about Hardik Pandya's relationships on a podcast went viral. He jokingly said Pandya changes his 'Paro' daily, referencing Pandya's past relationships and recent announcement with Mahika Sharma, following his divorce from Natasa Stankovic. The remark sparked lighthearted discussion among fans.