Join us  

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहितकडे नेतृत्व, तर आफ्रिका दौऱ्यासाठी पार्थिव पटेलचे संघात पुनरागमन 

श्रीलंकेविरुद्ध होणारी टी-20 मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 8:04 PM

Open in App

मुंबई - श्रीलंकेविरुद्ध होणारी टी-20 मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने क्रिकेट खेळत असलेल्या विराट कोहलीला टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली असून, संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली असून, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात पार्थिव पटेलचे पुनरागमन झाले आहे.श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघसंघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हूडा, जयप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बसील थम्पी, जयदेव उनाडकट.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघसंघ -  विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, वृद्धिमन साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जयप्रीत बुमराह. 

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहली