Join us

रोहितचे ‘अचूक टायमिंग’ भारतासाठी फायदेशीर

पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिल्याच सामन्यात दोन कसोटी शतके ठोकली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 01:18 IST

Open in App

- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिल्याच सामन्यात दोन कसोटी शतके ठोकली. त्याचे हे कसोटीतील पुनरागमन शानदार ठरले. पाच दिवसीय क्रिकेटच्या प्रारूपात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल कोणतीही साशंकता नाही. शतके आणि धावा या कसोटीत महत्त्वाचे असले तरी शर्मा याने कसोटीवर लक्ष ठेवले. हा त्याच्या इच्छाशक्तीचा विजय आहे. त्याचे हे योग्य वेळी मिळालेले यश भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये फायदेशीर ठरेल.रोहित शर्माच्या शैलीत व्हिव्हियन रिचर्डसची शैली दिसते. त्याच्या फलंदाजीत सहजपणा आहे. त्यामुळे तो भविष्यात कसोटीत नक्कीच यश मिळवू शकतो. जगभरात रोहितच्या क्षमतेचे मोजकेच फलंदाज आहेत. त्याच्याकडे अचूक टायमिंगचे गिफ्ट आहे. अखेरच्या क्षणी फटका मारण्याची त्याची कला असाधारण आहे.३२ वर्षांच्या रोहित शर्माची कसोटी कारकीर्द संपण्याच्या मार्गावर होती. त्याने पहिल्या दोन कसोटीत शानदार खेळी केलेली असतानाही त्याला नियमित जागेचे आश्वासन सहा वर्षे देता आले नाही. जरी तो पांढºया चेंडूवरील सर्वात धोकादायक फलंदाज असला तरी कसोटीत त्याला आश्वासक म्हणवता येईल असे यश मिळू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर रोहित शर्माने सलामीला येऊन सुरुवात केली. गेल्या हंगामात शिखर धवनच्या खराब फॉर्ममुळे सलामीवीर म्हणून मयांक अग्रवाल अपयशी ठरला. त्यानंतर विश्वचषकानंतर के.एल. राहुल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत असल्याने संघ व्यवस्थापनाने दुसरा सलामीवीर शोधण्याचे ठरवले. या काळात संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांमध्ये अनौपचारिक चर्चा सुरू होती. कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शास्त्री यांना मायदेशातील मालिकेत रोहितला कसोटीत सलामीला संधी देण्याची इच्छा होती. त्यातून सलामीचा चांगला फलंदाज ते शोधत होते.रोहित संघात होता, मात्र त्याला संधी मिळत नव्हती. विशाखापट्टणममध्ये मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. हे बहुतेक त्याच्या मानसिकतेशी संबंधित होते.भूतकाळात रोहित शर्मा त्याच्या काही चुकांमुळे मागे पडला होता. हे त्याच्यासारखी क्षमता असलेल्या खेळाडूकडून अपेक्षित नव्हते.अखेरच्या दिवशी भारत विजयासाठी भारत काय करू शकतो हे पाहणे , रंजक ठरेल. पण शर्मा सलामीवीर म्हणून यशस्वी ठरला. त्याचे हे यश भारतीय संघाची उंची ठरवते. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ही एक मोठी बाब ठरेल.

टॅग्स :रोहित शर्मा