Join us

बर्थडे स्पेशल : हिटमॅन रोहित शर्माची लव्हस्टोरी माहिती आहे का?

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या लव्ह स्टोरीचीही चर्चा होत आहे. चला जाणून घेऊया रोहित शर्माची लव्ह स्टोरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 11:41 IST

Open in App

मुंबई : टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या लव्ह स्टोरीचीही चर्चा होत आहे. चला जाणून घेऊया रोहित शर्माची लव्ह स्टोरी...

स्पोर्ट्स मॅनेजरसोबत लग्न

रोहित शर्माने आपली स्पोर्ट्स मॅनेजर राहिलेली रितिका सजदेहसोबत १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केले होते.  दोघांची भेट पहिल्यांदा २००९  मध्ये बोरिवलीतील स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. रोहित शर्माने रितिकाला आपली स्पोर्ट्स मॅनेजर अपॉईंट केले होते. 

युवराज सिंगची बहिण

रितिका युवराज सिंगची राखी सिस्टर सुद्धा आहे.  प्रोफेशनल रिलेशन्समुळे दोघांच्या गाठी-भेटी वाढू लागल्या. लवकरच ते दोघे फ्रेंड बनले आणि नंतर एकमेकांचे बेस्ट फ्रेंड बनले.

(हिटमॅन रोहित शर्माच्या या इंटरेस्टिंग गोष्टी माहीत आहेत?)

सहा वर्ष डेटिंग

६ वर्षाच्या फ्रेंडशिपनंतर रोहितने ३ जून २०१५ रोजी बोरिवलीतील स्पोर्ट्स क्लबमध्ये रितिकाला लग्नासाठी प्रपोज केले होते. ६ महिन्यानंतर दोघे विवाहबंधनात अडकले. रोहित आणि रितिकाचे लग्न मुंबईतील ताज लॅंड्स हॉटेलमध्ये झाले असून या लग्नात विराटने सोनाक्षीसोबत केलेला डान्स भरपूर चर्चेत होता. 

टॅग्स :रोहित शर्माक्रिकेट