भारतामध्येच नाही तर अमेरिकेतही रोहित शर्माची क्रेझ; VIDEO पाहून चक्रावून जाल...

रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. भारतासह क्रिकेट माहित नसलेल्या अमेरिकेतही त्याचे प्रचंड चाहते आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 14:13 IST2022-08-07T14:12:35+5:302022-08-07T14:13:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rohit Sharma's craze in America; fans gathered to cheered up him in ground; see VIDEO | भारतामध्येच नाही तर अमेरिकेतही रोहित शर्माची क्रेझ; VIDEO पाहून चक्रावून जाल...

भारतामध्येच नाही तर अमेरिकेतही रोहित शर्माची क्रेझ; VIDEO पाहून चक्रावून जाल...


नवी दिल्ली: अमेरिका हा बेस बॉल आणि बास्केटबॉल खेळणारा देश आहे. तिथे क्रिकेटला अद्याप म्हणावे तितके महत्व मिळाले नाही. पण, तिथल्या लोकांमध्ये भारतीय क्रिकेटर्सची प्रचंड क्रेझ आहे. अमेरिकेत भारत आणि वेस्ट इंडिज यांचातला चौथा टी-20 सामना झाला. यादरम्यान आपल्या आवडत्या क्रिकेटर्सना पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी जमली होती. विशेषतः रोहित शर्माला भेटण्यासाठी चाहते आले होते. 


रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. भारतासह अनेक देशात रोहितचे चाहते आहेत. क्रिकेट माहित नसलेल्या  अमेरिकेतही त्याचे प्रचंड चाहते आहेत. रोहितचा अमेरिकेतील व्हिडिओ बीसीसीआयने पोस्ट केला आहे. या व्हिडिओत चाहते रोहितला भेटण्यासाठी, त्याच्यासोबत हस्तांदोलन करण्यासाठी आतुर झालेले पाहायला मिळत आहेत. रोहितनेही त्यांची उत्कंठा ताणून न धरता, त्यांची भेट घेतली. रोहितने जवळपास सर्वांशी हस्तांदोलन केले.

अमेरिकेत क्रिकेटची क्रेझ वाढू लागली आहे
गेल्या काही वर्षांत क्रिकेटने अमेरिकेचे दार ठोठावले आहे. आता हळूहळू या देशात क्रिकेटबद्दल लोकांमध्ये जागरुकता वाढली आहे. फ्लोरिडामध्ये झालेल्या T20I सामन्यांमध्ये त्याची मोठी भूमिका आहे. भारताने आत्तापर्यंत येथे 5 T20I सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 4 जिंकले आहेत. सध्या अमेरिकेचा संघ लहान देशांसोबत क्रिकेट खेळतो, येणाऱ्या काळात तो भारतासारख्या बलाढ्य देशासोबत सामना खेळेल, अशी आशा आहे.

Web Title: Rohit Sharma's craze in America; fans gathered to cheered up him in ground; see VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.