अहमदाबाद : भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल करीत राष्ट्रीय निवड समितीने शनिवारी अनुभवी रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून दूर केले. २०२७ चा विश्वचषक डोळ्यांपुढे ठेवून सलामीचा युवा फलंदाज आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल याच्याकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झटपट क्रिकेटचेही नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
गिलकडे सर्व प्रकाराचे नेतृत्व सोपविण्याची ही पहिली पायरी मानली जाते. रोहित आणि विराट कोहली यांना १५ सदस्यांच्या भारतीय संघात स्थान देण्यात आले असून, श्रेयस अय्यर हा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत उपकर्णधार असेल.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कार्यभार व्यवस्थापनांतर्गत विश्रांती देण्यात आली. डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल हादेखील वनडे संघात परतला. ही मालिका १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान होईल. त्यानंतर ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळविली जाईल.
जडेजा वनडेत महत्त्वाचा खेळाडू
अष्टपैलू रवींद्र जडेजा याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले. मात्र, तो वनडे प्रकारात भारतीय संघाच्या रणनीतीचा महत्त्वाचा खेळाडू असल्याचे आगरकर यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीत तीन फिरकीपटू खेळवणे शक्य नाही. पण, जडेजा आमच्यासाठी मोलाचा खेळाडू आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे जडेजाची उणीव जाणवू देणार नाहीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रोहितला निर्णय कळवला : आगरकर
निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी रोहितला हा निर्णय कळविल्याचे सांगितले. विराट- रोहित २०२७चा वनडे विश्वचषक खेळतील का, असे विचारताच आगरकर यांनी अस्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले, ‘दोघेही वनडे प्रकारात खेळत असल्याने आम्ही त्यांना निवडले आहे.’ रोहितने हा निर्णय स्वीकारला का, या प्रश्नाच्या उत्तरात आगरकर यांचे मत असे की, ‘रोहित आणि आमच्यातील ही चर्चा आहे. काहीच वनडे सामने खेळायचे असल्याने वेगळे कर्णधार नेमणे योग्य नाही. यामुळे रणनीती आखण्यात अडचणी येतात. तीन प्रकारांत तीन कर्णधार असावेत, हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही.’
वनडे संघ सलामीवीर : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल
मधली फळी : शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक)
अष्टपैलू : अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
वेगवान गोलंदाज : हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा
फिरकीपटू : कुलदीप यादव
टी-२० संघ
सलामीवीर : अभिषेक शर्मा,
शुभमन गिल
मधली फळी : संजू सॅमसन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक)
अष्टपैलू : रिंकू सिंग, नितीशकुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर
वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा
फिरकीपटू : वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.
Web Title : रोहित शर्मा बाहर, शुभमन गिल ऑस्ट्रेलिया दौरे पर करेंगे नेतृत्व
Web Summary : रोहित शर्मा को वनडे कप्तानी से हटाया गया। शुभमन गिल ऑस्ट्रेलिया दौरे का नेतृत्व करेंगे। कोहली, अय्यर टीम में। बुमराह को आराम। जडेजा बाहर, लेकिन महत्वपूर्ण। चयनकर्ताओं ने रोहित को सूचित किया।
Web Title : Rohit Sharma Out, Shubman Gill to Lead in Australia Tour
Web Summary : Rohit Sharma removed as ODI captain. Shubman Gill leads Australia tour. Kohli, Iyer in squad. Bumrah rested. Jadeja out but important. Selectors informed Rohit.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.