Join us  

रोहित शर्माचा 200 तर अजिंक्यचा 30 अॅव्हरेज, तुम्ही कोणाला संधी देणार ? - रवी शास्त्री

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात आणि  पहिल्या वनडेमध्ये भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या नावाने बोटे मोडणा-या क्रिकेट विश्लेषकांचा समाचार घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 2:55 PM

Open in App
ठळक मुद्दे अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या दोघांमध्ये रोहितला का संधी दिली ? त्याचे उत्तर दिले आहे. सेंच्युरियन कसोटीच्यावेळी नेटमध्ये सराव सुरु असताना अजिंक्यला सूर सापडताना दिसत होता

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात आणि  पहिल्या वनडेमध्ये भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या नावाने बोटे मोडणा-या क्रिकेट विश्लेषकांचा समाचार घेतला आहे. सर्व तज्ञ कुठे गेले आता ? असा सवाल शास्त्रींनी विचारला आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना शास्त्रींनी अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या दोघांमध्ये रोहितला का संधी दिली ? त्याचे उत्तर दिले आहे. 

दक्षिण आफ्रिका दौ-याच्या आधीपासूनच रोहित शर्मा फुल फॉर्ममध्ये होता. त्याबद्दल संघ व्यवस्थापनाच्या मनात कोणताही संशय नव्हता. त्याचवेळी अजिंक्य रहाणेचा संघर्ष सुरु होता. मैदानावरच नव्हे नेटमध्येही फलंदाजी करताना अजिंक्यला अडचणी जाणवत होत्या. कसोटीमध्ये रोहितची फलंदाजीमधली सरासरी 200 पेक्षा जास्त होती आणि वनडेमध्ये त्याने वर्षभरात 1200 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याला काय सांगायला हवे होते. तुझ्या धावा महत्वाच्या नाहीत. क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स महत्वाचा असतो.  अजिंक्यमध्ये नक्कीच क्षमता आहे पण 2017 मध्ये अजिंक्यची धावांची सरासरी 30 होती.                                               

सेंच्युरियन कसोटीच्यावेळी नेटमध्ये सराव सुरु असताना अजिंक्यला सूर सापडताना दिसत होता तर रोहितचा संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्यावेळच्या परिस्थितीनुसार आम्ही अजिंक्यला अंतिम अकरामध्ये स्थान दिले आणि त्याने वाँडर्सवर धावा केल्या असे रवी शास्त्रींनी सांगितले. 

त्याचप्रमाणे त्यांनी भुवनेश्वर कुमारच्या निवडीवरही खुलासा केला. भुवनेश्वर पहिल्या आणि तिस-या कसोटीत संघामध्ये होता. दुस-या कसोटीत त्याला स्थान मिळाले नव्हते. भुवनेश्वरला संघात स्थान देण्याचा आणि वगळण्याचा निर्णय खेळपट्टी आणि तिथल्या वातावरणानुसार घेण्यात आला होता असे शास्त्री म्हणाले.                                       

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८रवी शास्त्री