पंड्या, राहुलनंतर रोहित शर्माची वाट लागणार... बॉलिवूडच्या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

बीसीसीआयने सोफिया हयातचा खुलासा गंभीरपणे घेतला तर रोहितची कारकिर्द धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 17:18 IST2019-01-20T17:15:33+5:302019-01-20T17:18:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rohit Sharma will be in danger after hardik pandya and lokesh rahul ... Bollywood actress made a shocking disclosure | पंड्या, राहुलनंतर रोहित शर्माची वाट लागणार... बॉलिवूडच्या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

पंड्या, राहुलनंतर रोहित शर्माची वाट लागणार... बॉलिवूडच्या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

मुंबई : कॉफी विथ करण-6 या कार्यक्रमामध्ये आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारतीय संघातील हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल हे दोघेही अडचणीत सापडले आहेत. बीसीसीआयने त्यांच्याविरोधात कडक धोरणांची अमंलबजावणी केली आहे. आता भारताचा फलंदाज रोहित शर्माचीही वाट लागण्याची शक्यता आहे. कारण एका बॉलिवूड अभिनेत्रीनंतर रोहितबद्दलची धक्कादायक बाब उघड केली आहे.

हार्दिक आणि लोकेश यांनी बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीबरोबर अफेअर, डेटिंग आणि लग्न करायला आवडेल, अशी आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यामुळे बीसीसीआयने त्यांना ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातून माघारी बोलावले. आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते, याविषयी साऱ्यांनाच उत्सुकता आहे. या दोन्ही खेळाडूंनी फक्त वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर किती कडक कारवाई होते आणि आगामी आयपीएल व विश्वचषक ते खेळू शकतील का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

हार्दिक आणि राहुल यांनी वक्तव्य केल्यावर त्यांच्यावर जर एवढी कडक कारवाई होत असेल तर रोहितने तर यापेक्षा अधिक गंभीर कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वीही रोहित एकदा एका पार्टीतील फोटोंमुळे अडचणीत आला होता. त्यावेळी भारतीय संघ पाकिस्तानात आशिया चषक खेळायला गेला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित काही संघातील खेळाडूंबरोबर एका पार्टीला गेला होता. या पार्टीतील ललनांबरोबरचे त्याचे फोटो वायरल झाले होते.

रोहितचे बॉलीवूडमधील सोफिया हयात या मॉडेलबरोबर अफेअर असल्याचे म्हटले गेले. सुरुवातीला या दोघांनी आमच्यामध्ये फक्त मैत्री असल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर सोफियाने त्यांच्यातील नात्याबद्दल सांगितले होते. या सोफियानेच आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. जर बीसीसीआयने सोफिया हयातचा खुलासा गंभीरपणे घेतला तर रोहितची कारकिर्द धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

सोफिया म्हणाली की, " रोहित आणि भेट एका क्लबमध्ये झाली. एक सिनेमा पूर्ण झाल्यावर आम्ही सारे पार्टी करत होतो. त्यावेळी मी डान्स करत असताना एका मित्राने माझी आणि रोहितची ओळख करून दिली. त्यानंतर आम्ही दोघे बोलायला लागलो आणि काहीच वेळात कुणी नसेल अशा शांत ठिकाणी गेलो. त्यानंतर रोहितने माझा किस घेतला. त्यानंतर सारं काही एवढ्या झटपट झाले की ते सांगता येणार नाही. " 

Web Title: Rohit Sharma will be in danger after hardik pandya and lokesh rahul ... Bollywood actress made a shocking disclosure