Join us

Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...

Harbhajan Singh Rohit Sharma Ritika: शो मध्ये रोहित आणि रितिकाला मजेशीर प्रश्न विचारण्यात आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:37 IST

Open in App

Harbhajan Singh Rohit Sharma Ritika: टी२० नंतर रोहित शर्मानेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. IPL 2025 नंतर तो सध्या त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगरोहित शर्माची मुलाखत घेताना दिसतोय. रोहितची पत्नी रितिका आणि हरभजनची पत्नी गीता बसरादेखील मुलाखतीत दिसत आहेत. हरभजन आणि त्याची पत्नी गीता यांनी नवीन शो सुरू केला आहे. त्यात पहिली मुलाखत रोहित शर्मा आणि रितिका यांची असणार आहे. या शो मध्ये त्यांनी मजेशीर प्रश्न विचारण्यात आले आहेत.

हरभजनच्या नवीन शोमध्ये रोहित-रितिका

टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा यांनी 'पर्पल रोझ एंटरटेनमेंट' ही नवीन निर्मिती कंपनी सुरू केली आहे. या बॅनरखाली त्यांनी 'हू इज द बॉस' हा नवीन चॅट शो सुरू केला आहे. या चॅट शोमध्ये रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये हरभजन आणि रोहित जुन्या आठवणी सांगताना दिसले. हरभजन सिंगने या चॅट शो चा प्रोमो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हरभजन सिंग आणि रोहित शर्मा मजेदार मूडमध्ये दिसत आहेत.

घरचा बॉस कोण?

हरभजन-गीताने रितिकालाही प्रश्न विचारले. रोहितचा विसराळू स्वभाव पाहता, रोहितने जेव्हा 'आय लव्ह यू' म्हटले असेल, तेव्हा तो कधी चुकून 'आय यू' म्हणाला असेल का? असा सवाल त्याने केला. यावर दोन्ही क्रिकेटपटू जोरात हसायला लागले. तसेच, घरचा बॉस कोण असाही सवाल विचारण्यात आला, त्यावर दोघेही ५०-५० बॉस आहेत, असे रोहितने उत्तर दिले.

भज्जीने केली रोहितची नक्कल

शो दरम्यान भज्जीने रोहित शर्माच्या बोलण्याच्या पद्धतीची नक्कल केली. तो म्हणाला की जेव्हा आम्ही एकत्र खेळत होतो, तेव्हा आम्ही रोहितला त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे 'शाणा' म्हणायचो, कारण रोहित मैदानात एकदम वेगळाच चालायचा. बोलतानाही त्याची भाषा एकदम 'मुंबईया टाइप' असायची. हे ऐकून रोहित हसायला लागला.

टॅग्स :रोहित शर्माहरभजन सिंगऑफ द फिल्ड