Join us  

Rohit Sharma vs Virat Kohli, Sanju Samson: संजू सॅमसनने सांगितला रोहितबद्दलचा किस्सा; नेटकरी मात्र विराटवर संतापले!

किस्सा रोहितचा, टीका विराटवर.... पाहा नक्की काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 1:33 PM

Open in App

Rohit Sharma vs Virat Kohli, Sanju Samson: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची कायम तुलना केली जाते. फलंदाजीत विराट बेस्ट की रोहित, हा विषय गेले कित्येक वर्षे चर्चेत होता. त्यानंतर रोहित कर्णधार झाल्यापासून हीच तुलना कर्णधारपदाबाबत होण्यास सुरूवात झाली आहे. ही चर्चा पुढील आणखी किती वर्षे सुरू राहिला कोणालाही अंदाज बांधता येणं कठीण आहे. पण सध्या एका वेगळ्याच मुद्द्यावरून विराट आणि रोहित यांच्यात तुलना केली जात आहे. भारताचा प्रतिभावान विकेटकिपर-फलंदाज संजू सॅमसन याने रोहितबद्दलचा एक किस्सा सांगितला. तो किस्सा ऐकल्यानंतर नेटकरी विराट कोहलीवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले.

राजस्थान रॉयल्ससाठी दमदार कामगिरी करणारा संजू सॅमसन सर्वात आधी IPL मध्येच चमकला होता. राजस्थानकडून चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले. पण तेथे मात्र तो फारशी चमक दाखवू शकला नाही. तशातच संघात एकाच स्थानासाठी प्रचंड स्पर्धा असल्यामुळे त्याला फार काळ संघात समाविष्ट करण्यात आलं नाही. पण संजू सॅमसनने नुकताच सांगितलेल्या एका किश्श्यामुळे त्याच्या संघातील एक्झिटच्या मागे विराटचाच हात आहे, असा माहोल नेटकऱ्यांकडून तयार करण्यात आला आणि नेटकरी विराटवर चांगलेच संतापले.

संजू सॅमसनने नुकतीच एका मुलाखत दिली. त्यात त्याने टीम इंडियातील सुरूवातीचा प्रवास सांगितला. त्यावेळी तो म्हणाला की, मी ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो. सगळे अनुभवी खेळाडू बसले होते. विराट आणि रोहित दोघेही तिथेच होते. त्यावेळी विराट कर्णधार होता. कोणाशी बोलावं, बोलायला सुरूवात कशी करावी हे मला काहीच कळत नव्हतं. मी एका जागी गप्प बसून राहिलो. त्यावेळी रोहित स्वत:च माझ्याजवळ आला आणि म्हणाला की चल, जेवायला जावूया. मी पण पटकन उठलो आणि त्याच्याबरोबर डिनरला गेलो. एका नवख्या आणि युवा खेळाडूला पटकन आपलंसं करण्याची कला रोहितमध्ये आहे हे मला त्याच दिवशी समजलं. त्यानंतर आमची चांगली मैत्री झाली.

संजू सॅमसनने हा किस्सा सांगितला. त्यात तो विराट कोहलीबाबत काहीच बोलला नव्हता. पण नेटकऱ्यांन मात्र विराटवर सडकून टीका केली. युवा खेळाडूंशी कसं वागावं, हे विराटने रोहितकडून शिकलं पाहिजे असं एका युजरने लिहिलं. तर, 'कोहली युवा खेळाडूंसाठी उपलब्ध नसतो ही ऐकलेली गोष्ट खरी निघाली', असा टोमणा एका युजरने मारला. सगळे युवा खेळाडू रोहितशी छान मैत्री का करतात ते समजलं, असंही एका युजरने लिहिलं.

--

--

दरम्यान, यंदाच्या हंगामात विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांची फलंदाजी अतिशय वाईट सुरू आहे. विराटने आतापर्यंत ११ सामन्यात केवळ १ अर्धशतक झळकावलं आहे. तर रोहितला देखील १० सामन्यात फारशी चमक दाखवता आलेली नाही.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्माविराट कोहलीसंजू सॅमसन
Open in App