Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?

रोहित शर्मा ७ वर्षांनी तर विराट कोहली तब्बल १५ वर्षांनंतर या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:52 IST

Open in App

देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमधील प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील २०२५-२६ च्या हंगामात रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडीही मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा ७ वर्षांनी तर विराट कोहली तब्बल १५ वर्षांनंतर या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा कधीपासून रंगणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. इथं एक नजर टाकुयात दोन दिग्गज प्रतिनिधीत्व करत असणाऱ्या संघाच्या वेळापत्रकासह या स्पर्धेतील या जोडीच्या खास रेकॉर्डवर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कोहली दिल्ली तर रोहित मुंबईच्या संघाकडून उतरणार मैदानात! 

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामाची सुरुवात २४ डिसेंबरपासून होत आहे.  विराट कोहली दिल्लीकडून तर रोहित शर्मा मुंबईच्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंनी या स्पर्धेत किमान दोन सामने खेळण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे ही जोडी किमान दोन सामने तरी खेळताना दिसेल. दोघांनीही या स्पर्धेची तयारीही सुरु केली आहे. पण ते नेमके कोणत्या सामन्यासाठी उपलब्ध असणार ते गुलदस्त्यातच आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानातील वनडेच्या  पार्श्वभूमीवर ही जोडी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यातच मैदानात उतरतील अशी अपेक्षा आहे.  

विराट कोहलीच्या दिल्ली संघाचे वेळापत्रक  

२४ डिसेंबर: दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश (बंगळुरु)२६ डिसेंबर: दिल्ली विरुद्ध गुजरात (बंगळुरु)२९ डिसेंबर: दिल्ली विरुद्ध सौराष्ट्र (अलुर)३१ डिसेंबर: दिल्ली विरुद्ध ओडिसा (अलुर)३ जानेवारी: दिल्ली विरुद्ध सर्विसेज (बंगळुरु)६ जानेवारी: दिल्ली विरुद्ध रेल्वे (अलुर)८ जानेवारी : दिल्ली विरुद्ध हरयाणा (बंगळुरु)

मुंबई संघाचे वेळापत्रक  

२४ डिसेंबर: मुंबई विरुद्ध सिक्किम (जयपूर)२६ डिसेंबर: मुंबई विरुद्ध उत्तराखंड (जयपूर)२९ डिसेंबर: मुंबई विरुद्ध छत्तीसगड (जयपूर)३१ डिसेंबर: मुंबई विरुद्ध गोवा (जयपूर)३ जानेवारी: मुंबई विरुद्ध महाराष्ट्र (जयपूर)६ जानेवारी: मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश (जयपूर)८ जानेवारी: मुंबई विरुद्ध पंजाब (जयपूर)

विराट-रोहितचा विजय हजारे ट्रॉफीतील रेकॉर्ड

विराट कोहलीनं आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १३ साने खेळले असून ६८.२५ च्यासरासरीने त्याने ८१९ धावा केल्या आहेत. १०६.०८ च्या स्ट्राइक रेटसह त्याने या स्पर्धेत ४ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत.  रोहित शर्माने १८ सामन्यात ३८.७ च्या सरासरीसह १ शतक आणि ३ अर्धसतकाच्या मदतीने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ५८१ धावा केल्या आहेत.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit and Virat to shine in Vijay Hazare Trophy!

Web Summary : Rohit Sharma and Virat Kohli will play in the Vijay Hazare Trophy 2025-26. Kohli represents Delhi, and Rohit, Mumbai. BCCI mandates senior players participate in at least two matches. Kohli has 819 runs with 4 centuries; Rohit has 581 runs with 1 century in this tournament.
टॅग्स :विजय हजारे करंडकरोहित शर्माविराट कोहलीबीसीसीआय