Join us

Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL 2nd Test: टीम इंडियाच्या दणदणीत विजयानंतर विराट-रोहित आमनेसामने आले अन् मग... पुढे काय घडलं ते पाहा (Video)

सामना जिंकताच विराट अन् रोहित समोरासमोर आले, त्यावेळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 19:04 IST

Open in App

Rohit Sharma Virat Kohli, India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates: श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताने दुसरा कसोटी सामना २३८ धावांनी जिंकत २-०ने मालिका जिंकली. भारताने पहिल्या डावात २५२ तर श्रीलंकेने पहिल्या डावात १०९ धावा केल्या. त्यानंतर भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला आणि लंकेला ४४७ धावांचे आव्हाना दिले. कर्णधार दिमुथ करुणारत्नेने शतकी खेळी करूनही श्रीलंकेचा दुसरा डाव २०८ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आले. या विजयानंतर साऱ्यांनीच जल्लोष केला. त्यातही, विराट कोहली आणि रोहित शर्मा आमनेसामने आल्यावर नक्की काय घडलं ते पाहा. (Viral Video)

भारतीय संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग १५ वा कसोटी मालिका विजय ठरला. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने १४ वा आंतरराष्ट्रीय सामना जिंकला. हा सामना जिंकल्यानंतर सर्वजण आनंदोत्सव साजरा करत होते. त्याच वेळी मैदानावर विराट आणि रोहित आमनेसामने आले. तेव्हा दोघांनीही अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने एकमेकांना हस्तांदोलन करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, भारताच्या श्रेयस अय्यरला सामनावीराचा किताब देण्यात आला. पहिल्या डावात ९२ आणि दुसऱ्या डावातील अर्धशतक (६७) असा दमदार खेळ केल्यामुळे त्याचा गौरव करण्यात आला. त्याशिवाय, मालिकेत पहिल्या सामन्यात ९६, दुसऱ्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण करणाऱ्या रिषभ पंतला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माविराट कोहलीरिषभ पंत
Open in App