Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शर्माने कॅच पकडला अन् चाहत्याने हात जोडले

या सामन्यात काही गोष्टी अशा घडल्या की खेळाडू आणि चाहते यांच्यामध्ये अॅक्शन-रिअॅक्शनचा खेळ चांगलाच रंगला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:41 IST

Open in App
ठळक मुद्दे हा झेल टिपल्यावर धोनी आणि कर्णधार विराट कोहलीनेही रोहितचे कौतुक केले.

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद चाहत्यांनी लुटला. या सामन्यात काही गोष्टी अशा घडल्या की खेळाडू आणि चाहते यांच्यामध्ये अॅक्शन-रिअॅक्शनचा खेळ चांगलाच रंगला. या सामन्यात रोहित शर्माने एक झेल टिपला आणि त्यानंतर एका चाहत्याने चक्क हात जोडल्याचे पाहायला मिळाले.

दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने संयत सुरुवात केली होती. त्यावेळी भारताच्या कुलदीप यादवने भारताला यश मिळवून दिले होते. वेस्ट इंडिजचा फलंदाज रोवमन पॉवेल भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर फसला. त्याचा उडालेला झेल वेगाने महेंद्रसिंग धोनीच्या बाजूने गेला. त्यावेळी रोहितने तत्परता दाखवन तो झल टिपला. हा झेल टिपल्यावर धोनी आणि कर्णधार विराट कोहलीनेही रोहितचे कौतुक केले. त्यानंतर हा झेल पकडल्यामुळे मैदानातील एका युवा चाहत्याने चक्क देवापुढे हात जोडले.

हा पाहा व्हिडीओ

टॅग्स :रोहित शर्मामहेंद्रसिंह धोनीविराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज