रोहित शर्मा IPL 2024 नाही खेळणार? Mumbai Indiansने पोस्ट केला इमोशनल Video 

३६ वर्षीय रोहित आता नेमकं काय करणार, असा सवाल चाहत्यांना पडला आहे. त्यात मुंबई इंडियन्सने रोहितसाठी एक इमोशनल व्हिडीओ पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 06:54 PM2023-12-15T18:54:41+5:302023-12-15T18:55:07+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma to quit Mumbai Indians, not play IPL 2024? Tribute video by Mumbai Indians for Rohit Sharma | रोहित शर्मा IPL 2024 नाही खेळणार? Mumbai Indiansने पोस्ट केला इमोशनल Video 

रोहित शर्मा IPL 2024 नाही खेळणार? Mumbai Indiansने पोस्ट केला इमोशनल Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) शुक्रवारी अचानक इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या पर्वासाठी हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya Captain) नावाची कर्णधार म्हणून घोषणा केली. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. ३६ वर्षीय रोहित आता नेमकं काय करणार, असा सवाल चाहत्यांना पडला आहे. त्यात मुंबई इंडियन्सने रोहितसाठी एक इमोशनल व्हिडीओ पोस्ट केल्याने हिटमॅन आयपीएल २०२४ खेळणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

बिग ब्रेकिंग- हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ मध्ये करणार मुंबई इंडियन्सचे नेतृत्व, रोहितचं काय?

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० अशी पाच जेतेपदं पटकावली. चेन्नई सुपर किंग्सने मागच्या वर्षी आयपीएल जिंकण्यापूर्वी MI हा सर्वाधिक ५ जेतेपदं जिंकणारा संघ होता. रोहितने आयपीएलमध्ये १५८ सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी ८७ सामने जिंकले. ६७ सामन्यांत मुंबईची हार झाली, तर ४ सामने टाय राहिले. रोहितने आयपीएलमध्ये एकूण २४३ सामन्यांत २९.५८च्या सरासरीने ६२११ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ५५४ चौकार व २५७ षटकार खेचले आहेत.

माहेला जयवर्धने काय म्हणाला?
''मुंबई इंडियन्ससाठी भविष्याच्या तयारीच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. सचिन तेंडुलकर ते हरभजन सिंग आणि रिकी पाँटिंग ते रेहित शर्मा यासारख्या दिग्गजांचे मुंबई इंडियन्सला नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. आता भविष्याचा विचार करताना निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली आहे,''असे जयवर्धने म्हणाला. 
 

Web Title: Rohit Sharma to quit Mumbai Indians, not play IPL 2024? Tribute video by Mumbai Indians for Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.