"रोहित शर्मा पुन्हा बनणार Mumbai Indians चा कर्णधार"; माजी खेळाडूच्या दाव्याने वीरू स्तब्ध

काल तिसऱ्या पराभवानंतर वानखेडे स्टेडियमबाहेर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी रोष व्यक्त करताना रोहितला पुन्हा कर्णधार बनवा, असा सूर आवळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 04:38 PM2024-04-02T16:38:51+5:302024-04-02T16:39:33+5:30

whatsapp join usJoin us
"Rohit Sharma to captain Mumbai Indians again"; Veeru stunned by former player's claim | "रोहित शर्मा पुन्हा बनणार Mumbai Indians चा कर्णधार"; माजी खेळाडूच्या दाव्याने वीरू स्तब्ध

"रोहित शर्मा पुन्हा बनणार Mumbai Indians चा कर्णधार"; माजी खेळाडूच्या दाव्याने वीरू स्तब्ध

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mumbai Indians Captaincy : मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने मोठ्या थाटात गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) पुन्हा आपल्या ताफ्यात आणले आणि लगेच कर्णधारपदही दिले. त्यामुळे रोहितचे चाहते प्रचंड दुखावले आणि त्यांनी हार्दिकला टार्गेट करण्यास सुरुवात केली. हार्दिकच्या नेतृत्वाखाली MI ला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागल्याने चाहत्यांच्या रागात भर पडली आहे. काल वानखेडे स्टेडियमबाहेर चाहत्यांनी रोष व्यक्त करताना रोहितला पुन्हा कर्णधार बनवा, असा सूर आळवला. त्यात भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारी ( Manoj Tiwari) याने मोठा दावा केला आहे.

Mumbai Indiansच्या चाहत्यांसाठी हार्दिक पांड्याची पोस्ट; वाचा आता काय म्हणतोय... 

मुंबई इंडियन्सचा आता पुढील सामना ७ एप्रिलला घरच्या मैदानावरच होणार आहे. त्यामुळे या ५ दिवसांत फ्रँचायझीमध्ये बऱ्याच हालचाली झालेल्या पाहायला मिळतील आणि कदाचीत रविवारपर्यंत कर्णधार बदलाचा निर्णय घेतला जाईल, असे मनोजचे म्हणणे आहे. त्याचा हा दावा ऐकून बाजूलाच बसलेला वीरेंद्र सेहवागही स्तब्ध झालेला दिसला. क्रिकबझशी बोलताना मनोज तिवारी म्हणाला, ''मला वाटते की हार्दिक पांड्या दडपणाखाली आहे, कदाचित त्यामुळेच त्याने राजस्थानविरुद्ध गोलंदाजी केली नाही. याआधीच्या सामन्यांमध्ये सुरुवातीला चेंडू स्विंग होत असताना त्याने गोलंदाजी केली होती. कालही त्याने गोलंदाजी करायला हवी होती.''


''मला असे वाटते की रविवारपर्यंत मुंबई इंडियन्स फ्रँचायझी मोठा निर्णय घेतील आणि  रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवतील. कारण फ्रँचायझी क्रिकेट किंवा त्यांच्या मालकांना मी जेवढा समजतो, त्यानुसार ते निर्णय घेताना मागचापुढचा विचार करत नाही. मुंबईला एकही गुण मिळवता आलेला नाही आणि हार्दिकचे नेतृत्व साधारण दिसले आहे. तो गोलंदाजांचा योग्य वापर करू शकलेला नाही. हैदराबाद खूप धावा चोपत होता तेव्हा त्याने गोलंदाजी सुरू ठेवली. याशिवाय संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहला १३व्या षटकात गोलंदाजी दिली. त्यामुळे फ्रँचायझी मोठा निर्णय घेऊ शकतात, कारण वातावरण योग्य वाटत नाही,''असा दावा मनोजने केला.  

Web Title: "Rohit Sharma to captain Mumbai Indians again"; Veeru stunned by former player's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.