Join us

रोहित शर्मा फिटनेसवर घेतो अपार मेहनत, पाहा हा व्हिडीओ...

काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माचा जिममधला एक व्हिडीओ आला. या व्हिडीओमध्ये रोहित फिटनेसवर किती मेहनत घेतो, हे तुम्हाला पाहता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 20:48 IST

Open in App
ठळक मुद्देएकेकाळी भारताच्या रोहित शर्माला आळशी क्रिकेटपटू, असे म्हटले जायचे.

मुंबई : प्रत्येक खेळाडूसाठी फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा असतो. एकेकाळी भारताच्या रोहित शर्माला आळशी क्रिकेटपटू, असे म्हटले जायचे. पण तो आपल्या फिटनेसवर किती अपार मेहनत घेतो, हे तुम्हाला माहिती नसेल. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माने आपला जिममधला एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये रोहित फिटनेसवर किती मेहनत घेतो, हे तुम्हाला पाहता येईल.

हा पाहा रोहितच्या फिटनेसचा व्हिडीओ

इंग्लंड दौऱ्यात कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताला एकदिवसीय मालिका गमवावी लागली होती. त्याचबरोबर कसोटी मालिकेतही भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर कोहलीने आशिया चषक स्पर्धेसाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि रोहितकडे संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले. रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताला आशिया चषकात एकही सामना गमवावा लागला नाही. रोहित कर्णधार असताना भारत या मालिकेत अपराजित राहीला. त्यामुळेच आता कोहलीकडून रोहितकडे नेतृत्त्व देण्यात यावे, असे चाहते म्हणत आहेत.

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहली