Rohit Sharma Smashes 50Th International Hundred In Sydney : कॅप्टन्सी काढून घेतल्यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मानं आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून देत मोठा धमाका केला आहे. रोहित शर्मानं सिडनीच्या मैदानात आपल्या वनडे कारकिर्दीतील ३३ वे शतक झळकावले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याच्या भात्यातून आलेले हे ९ वे शतक ठरले. एवढेच नाही तर आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या भात्यातून आलेले हे ५० वे शतक आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
३८ वर्षीय रोहित शर्मानं १०५ चेंडूंमध्ये आपलं ३३वं वनडे शतक झळकावत इतिहास रचला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतकं पूर्ण करणारा फक्त दहावा खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या खात्यात १२ शतकांची नोंद असून आंतरारष्टीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ५ शतके झळकावली आहेत. तो क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारा फलंदाजही आहे.
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
७ महिन्यांचा ब्रेक तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी
ऑस्ट्रेलियन संघाने दिलेल्या २३७ धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल स्वस्तात परतल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली जमली. दोघांनी सामना एकहाती करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे खांदे पाडले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये केलेल्या शतकी खेळीनंतर त्याच्या भात्यातून सात महिने आणि दोन वनडे सामन्यानंतर शतकी खेळी पाहायला मिळाली.
वनडेतील कारकिर्द धोक्यात असलेल्या चर्चेला पूर्णविराम देणारी खेळी
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आले होते. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळण्याची वेळ आल्यामुळे रोहित शर्माची वनडे कारकिर्द धोक्यात असल्याची चर्चा रंगताना दिसली. पर्थच्या पहिल्या वनडेत तो अपयशी ठरला. पण त्यानंतर ॲडलेडच्या मैदानात त्याने वेळ घेत संयमी खेळीसह अर्धशतक झळकावले. या खेळीनंतर आता त्याच्या भात्यातून धमाकेदार आणि विक्रमी शतक पाहायला मिळाले. जे त्याच्या वनडेतील भविष्याबद्दल रंगणाऱ्या चर्चेला पूर्णविराम देणारे आहे.