रोहितनं शेअर केला पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो; त्यावरुन युवराज सिंगची पत्नी नाराज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 10:06 IST2019-12-03T10:05:28+5:302019-12-03T10:06:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rohit Sharma share romantic pic with wife Ritika; Hazel keech trolled Yuvraj singh | रोहितनं शेअर केला पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो; त्यावरुन युवराज सिंगची पत्नी नाराज

रोहितनं शेअर केला पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो; त्यावरुन युवराज सिंगची पत्नी नाराज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचे खेळाडू आपापल्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देत आहेत. रोहित शर्मानं सोमवारी पत्नी रितिकासोबतचा एक फोटो शेअर केला. त्यावरून युवराज सिंगची पत्नी हेझल किचनं सिक्सर किंगला ट्रोल केलं. रोहित-रितिकाचा तो फोटो पाहून हेझल पती युवराजवर थोडीशी नाराज झाली. 

रोहितनं शेअर केलेल्या फोटोत तो तिच्या पत्नीचा हातात हात पकडून कुठेतही जात असल्याचे दिसत आहे. त्यावर रोहितनं लिहिलं की,''मी याधीही आनंदी होतो, पण तुझा हातात हात घेतल्यानंतर त्यापेक्षा अधिक आनंदी झालो आहे.'' रोहितच्या या पोस्टवर रितिकानंही लिहिले की,''Aaawwww babyyyyyyy.'' या दोघांचं हे प्रेम पाहून हेझलनं युवीला ट्रोल केलं. तिनं लिहिलं की,''युवी माझ्यासाठी पण असंच काहीतरी पोस्ट शेअर करत जा. माझ्याशी लग्न करून तुला तीस वर्ष झाली, असं वाटतं. बघूया आज रात्री तुला जेवण मिळतं की नाही ते.''

 


 लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या युवीच्या हटके शुभेच्छा

युवीनं पोस्ट केली की,''लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा... असं वाटतंय की लग्नाला 30 वर्ष झालीत.''

Web Title: Rohit Sharma share romantic pic with wife Ritika; Hazel keech trolled Yuvraj singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.