Rohit Sharma Viral Video : रोहित शर्मा हा आपल्या फटकेबाजीशिवाय फिल्डवरील अन् फिल्डबाहेरील विनोदी धाटणीतील 'बोलंदाजी'मुळेही चर्चेत असतो. तो कधी काय बोलेल याचा नियम नसतो. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटनंतर आता त्याने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केलीये. एका बाजूला त्याच्या कसोटीतील निवृत्तीची चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला त्याचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो 'प्लेयर्स के साथ गंदी बातें करनी चाहिए।' असं म्हणताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित शर्मानं नुकतीच क्रीडा पत्रकार विमल कुमार यांना खास मुलाखत दिलीये. त्यावेळीच्या गप्पा गोष्टीत रोहित शर्मानं 'प्लेयर्स के साथ गंदी बातें करनी चाहिए।' असं म्हटले. वेगळा अर्थ काढू नका, अस म्हणत त्याने यावर लगेच स्पष्टीकरणही दिल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. गंती बातें.. म्हणजे खेळाडूला का खेळवलं जात नाही. त्याच काय चुकतंय त्या गोष्टीबद्दल त्याच्यासोबत चर्चा केली पाहिजे, असे तो म्हणाला आहे.
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
फिल्डवर असो की फिल्डबाहेर रोहित शर्माचा बोलण्याचा अंदाजच निराळा
रोहित शर्मा टीम इंडियाची कॅप्टन्सी करताना आपली खास छाप सोडली आहे. खेळाडूंसोबत तो खेळीमेळीनं वागताना दिसले. फिल्डवर खेळाडूंना सूचना करतानाही त्याची खास शैली पाहायला मिळाली आहे. फिल्डिंग वेळी अगदी निवांत राहणाऱ्या संघ सहकाऱ्यांना जागे करण्यासाठी त्याचा "कोई गार्डन में नहीं घुमेगा" हा डायलॉगही चांगलाच गाजला होता. 'ऐ भाई हीरो नहीं बनने का' म्हणत क्लोज फिल्डिंग करणाऱ्या सरफराज खानला आधी हेल्मेट घाल अशी केलेली सूचना असो अनेकदा त्याचा बोलण्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये फक्त वनडेत दिसणार
३८ वर्षीय रोहित शर्मानं आयपीएल सुरु असताना कसोटीतून निवृत्ती घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडे खेळण्याचा निर्णय घेतलाय. कसोटी कारकिर्दीत त्याने ६७ सामन्यात १२ शतकांसह ४३०० धावा केल्या आहेत. याआधी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर त्याने आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.