ठळक मुद्देभन्नाट प्रश्नांची गमतीशीर उत्तरंसंघातील कोणाची नकल करायला आवडेल? कोणाला गोलंदाजी करायला आवडणार नाही?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना बुधवारी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) एक व्हिडीओ शेअर केला. यात रोहित शर्मा, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे एकमेकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यात रोहित शर्मानं नव्या लूकबद्दल खुलासा केला.
या व्हिडीओत टीम इंडियाचा उप कर्णधार रोहित शर्माला त्याच्या नव्या क्लिन शेव्ह लूकबद्दल विचारले. त्यावर त्यानी दिलेलं उत्तर पाहून चहल व यादव यांनी कौतुक केले. तो म्हणाला,'' क्लिन शेव्ह केलं, कारण माझ्या मुलीला दाढी आवडत नाही. दाढी असेल तर ती माझ्यासोबत खेळत नाही. त्यामुळे तिच्यासाठी मी हा लूक केला आहे.''
युजवेंद्र चहलः वेज बिर्यानी
कुलदीप यादवः हे स्टेडियम... इथून मी कोलकाता नाइट रायडर्सकडून ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले
- टीम इंडियातील सर्वाधिक टुकार डान्सर
युजवेंद्र चहलः शिवम दुबे
कुलदीप यादवः शिवम दुबे
युजवेंद्र चहलः मोहम्मद शमी
कुलदीप यादवः भारत अरूण
- संघातील कोणाची नकल करायला आवडेल
युजवेंद्र चहलः रोहित शर्मा
कुलदीप यादवः मोहम्मद शमी
- कोणाला गोलंदाजी करायला आवडणार नाही
युजवेंद्र चहलः रोहित शर्मा
कुलदीप यादवः सूर्यकुमार यादव