Join us

'हिटमॅन' रोहित शर्मा आतुरतेनं पाहतोय या 'Life Changing Moment'ची वाट !

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी दौरा निम्म्यावर सोडून हिटमॅन रोहित शर्मा मायदेशी परतणार असल्याच्या बऱ्याच चर्चा मधल्या काळात रंगल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 16:25 IST

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी दौरा निम्म्यावर सोडून हिटमॅन रोहित शर्मा मायदेशी परतणार असल्याच्या बऱ्याच चर्चा मधल्या काळात रंगल्या. रोहितची पत्नी रितिकी सजदेह हिच्याकडे गोड बातमी आहे आणि त्यासाठी रोहित दौरा अर्ध्यावर सोडण्यासाठी तयार असल्याचे कारण, त्या चर्चांमधून समोर येत होते. मात्र, रोहितने ती गोड बातमी खरी असल्याचे स्पष्ट केले. बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघात सदस्य असलेल्या रोहितने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. 

31 वर्षीय रोहितने त्या मुलाखतीत मोठी बातमी दिली. पण, जेव्हा त्याने ही बातमी सहकाऱ्यांना सांगितली त्यावर त्यांची प्रतिक्रिया कशी होती, हेही रोहितने सांगितले. 'ही बातमी कळताच सहकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि सर्वांना हसू आवरले नाही. ते माझी थट्टा करायला लागले, कारण मी विसरभोळा आहे. मी अनेकदा गोष्टी विसरतो, परंतु मला आता असे करायचे नाही. कुटुंबातील नवीन सदस्याच्या स्वागतासाठी उत्सुक आहे,' असे रोहितने मुलाखतीत सांगितले. 

रोहित म्हणाला,'मी आणखी वाट पाहू शकत नाही. माझ्या आणि रितिकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरणार आहे. त्याची मी आतुरतेनं वाट पाहत आहे.'    

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया