Join us

Rohit Sharma, Lamborghini Urus : बाबोsss... 'हिटमॅन'ने घेतली ३ कोटींची आलिशान लॅम्बोर्गिनी कार; भन्नाट personalized interior चे फोटो एकदा पाहाच

रोहितच्या कारचा रंग टीम इंडियाच्या निळ्या रंगाशी मिळताजुळता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 19:28 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात अलीकडेच वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला व्हाईटवॉश देत टी२० मालिका जिंकल्या. महत्त्वाची बाब म्हणजे पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहितचे हे सुरुवातीचे दिवस आहेत. त्यात तो अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतोय. याचसोबत रोहित मैदानाबाहेरही काही कारणांमुळे चर्चेत आहे. १ मार्चला रोहितच्या अकाऊंटवरून विविध ट्वीट्स झाल्याने त्याचं अकाऊंट हॅक झाल्याची शंका चाहत्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे तो चर्चेत होता. तशातच आता रोहितने सुमारे ३ कोटींची आलिशान Lamborghini Urus कार घेतल्याची चर्चा आहे.

रोहितने नुकतीच अंदाजे ३ कोटी १० लाख रूपये किमतीची आलिशान अशी Lamborghini Urus कार विकत घेतल्याचं सांगितलं जात आहे. रोहितच्या नवीन कारचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार टीम इंडियाच्या निळ्या रंगाशी (Blu Eleos Metallic) मिळत्याजुळत्या रंगाची आहे. या कारच्या चाकांना २२ इंच डायमंड कट रिम्स (22 inch Nath diamond-cut rims) आहेत. तसेच विशेष प्रकारचं रोहितच्या पसंतीचं Sportivo Leather interior इंटीरियर आहे. त्यामुळे आता रोहितकडीला वाहनांच्या ताफ्यातही ही खास कार दिसणार आहे.

Cartoq ने दिलेल्या माहितीनुसार, रोहितच्या या कारमध्ये त्याच्या पसंतीच्या अनेक गोष्टी त्याने पर्सनलाईज करून घेतल्या आहेत. केबिनचा रंग हा लाल आणि काळ्याच्या कॉम्बिनेशमध्ये {dual-tone combination of Ross Alala (cherry red) and Nero (black)} तयार करण्यात आलं आहे. डॅशबोर्ड आणि वरील भाग काळ्या रंगाचा तर सीट्स व इतर भाग हा लाल रंगात आहे. या कारमध्ये 4.0 litre twin-turbocharged V8 petrol motor इंजिन आहे. तसंच या आलिशान कारमध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.

टॅग्स :रोहित शर्मालँबॉर्घिनीकार
Open in App