Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रोहित भाऊ'चा नादखुळा! फिटनेससाठी नाकारली खुद्द मुकेश अंबानी यांची 'ऑफर'; फोटो तुफान VIRAL

Rohit Sharma Mukesh Ambani Viral Photo: सामना पाहण्यासाठी रोहित शर्मा अंबानी कुटुंबासोबत VIP बॉक्समध्येच बसला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 14:47 IST

Open in App

Rohit Sharma Mukesh Ambani Viral Photo: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी भारत आणि अमेरिका यांच्यात टी२० विश्वचषक सामना झाला. या सामन्यादरम्यान मैदानाबाहेर अनेक मनोरंजक क्षण घडले. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि टीम इंडियाचा स्टार रोहित शर्मा यांच्यातील एका क्षणाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला. मुकेश अंबानी, नीता अंबानी, मोठा मुलगा आकाश अंबानी आणि अंबानींचा नातू सारेच या सामन्याला उपस्थित होते. त्यावेळी रोहित त्यांच्याच बाजूला बसला असताना एक मजेशीर प्रसंग घडला.

रोहित शर्मानेमुकेश अंबानींना दिला नकार

टी२० सामन्यादरम्यान अंबानी कुटुंबाच्या व्हीआयपी बॉक्समधील काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा येताच मुकेश आणि नीता अंबानी त्यांच्या जागेवरून उभे राहून त्यांचे स्वागत करत होते. सर्वांचे मन जिंकणाऱ्या या क्षणी, मुकेश अंबानी स्वतः रोहित शर्माला चहाचा कप देताना दिसले. पण सध्या अतिशय काटेकोरपणे आपल्या फिटनेसवर लक्ष ठेवणाऱ्या रोहित शर्माने नम्रपणे हसून चहाला नकार दिला. मुकेश अंबानी आणि रोहित शर्माच्या या फोटो आणि व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

---

---

---

सूर्यकुमार यादवची कर्णधारपदाची खेळी

दरम्यान, सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने वानखेडे स्टेडियमवर आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सुरुवातीच्या विकेट पडल्यानंतर, सूर्याने जबाबदारी स्वीकारली आणि ४९ चेंडूत नाबाद ८४ धावांची सामना जिंकवून देणारी खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान, त्याने १० चौकार आणि ४ उत्तुंग षटकार मारले. ईशान किशन (२०) आणि तिलक वर्मा (२५) यांच्या उपयुक्त योगदानाच्या मदतीने, भारताने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १६१ धावा केल्या. १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, अमेरिकन संघाला भारतीय गोलंदाजांपुढे फारशी फटकेबाजी करता आली नाही. मिलिंद कुमार (३४), संजय कृष्णमूर्ती (३७) आणि शुभम रांजणे (३७) यांनी त्यांच्या लढाऊ खेळींनी सामना शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला,पण अमेरिकेला १३२ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून मोहम्मद सिराजने ३ बळी घेतले, तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. या विजयासह, भारताने विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Sharma declines Mukesh Ambani's tea offer, prioritizing fitness.

Web Summary : During the India-USA T20 match, Mukesh Ambani offered Rohit Sharma tea, which he politely declined, focusing on his strict fitness regime. Suryakumar Yadav's match-winning innings led India to victory.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६रोहित शर्मानीता अंबानीमुकेश अंबानीव्हायरल फोटोज्