Join us

IND vs SL T20I: Live सामन्यात रोहित शर्माने केले असे कृत्य, व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

श्रीलंकाविरोधात धर्मशाळामध्ये दुसरा टी-20 सामन्यात रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 18:51 IST

Open in App

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकाविरोधात दुसर्या टी-20 सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही, पण मैदानाबाहेर लाइव्ह सामन्यात रोहितने केलेल्या एका कृत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यावर विविध कमेंट्स करत आहेत.

श्रीलंकाविरोधात धर्मशाळामध्ये दुसरा टी-20 सामन्यात रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला. दुसरा सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाळमध्ये होता. धर्मशाळामध्ये कडाक्याच्या थंडीत हा सामना सुरू होता. सामन्यापूर्वी पाऊसही पडून गेला होता. यामुळे मैदानावर चांगलीच थंडी पडली होती. यादरम्यान रोहितने कॅमेरामनची मस्करी केली.

थंडी जास्त असल्याने रोहित ड्रेसिंग रुमच्या बालकनीत कॉफी पित होता, तेवढ्याच कॅमरामनने त्याच्यावर फोकस केला. रोहितला मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर तो दिसला, यानंतर लगेच रोहितने कॅमेरामनला कॉफी घेण्याचा इशारा केला. यावेळी रोहितचे एक्सप्रेशनही मजेशीर होते. BCCI ने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

भारताची मालिकेत 2-0 ने आघाडी

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T-20 मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामनाही भारताने जिंकला तर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेचा 3-0 असा निर्वाळा होईल. याआधी वेस्ट इंडिजलाही भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 ने पराभूत केले होते.

टॅग्स :रोहित शर्माऑफ द फिल्डबीसीसीआय
Open in App