Join us

रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

Rohit Sharma New Car: रोहित शर्माच्या ताफ्यात Lamborghini Urus Se सामील झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 13:47 IST

Open in App

Rohit Sharma New Car: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नवीकोरी लॅम्बोर्गिनी (Lamborghini Urus Se) कार खरेदी केली आहे. भगव्या रंगाची ही सुपरकार दिसायला अतिशय आकर्षक आहे. पण, चाहत्यांच्या नजरा या कारच्या नंबर प्लेटवर खिळल्या आहेत. रोहित शर्माच्या कारचा नंबर ३०१५ आहे. हा सामान्य नंबर नसून, त्या नंबरचे एक खास कारण आहे. 

रोहित शर्माकडे यापूर्वी निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी कार होती. ती कार लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे, त्या कारचा नंबर ०२६४ होता. रोहित शर्माच्या नावे एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक २६४ धावांचा विक्रम आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. या धावसंख्येवरुनच रोहितने आपल्या कारचा नंबर ठेवला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वीच रोहितने त्याची ही कार एका फॅन्टसी अॅप विजेत्याला भेट म्हणून दिली.

रोहितच्या ३०१५ मागणी कहानी...

रोहित शर्माच्या मुलीचे नाव समायरा शर्मा आहे. समायरा हिचा जन्म ३० डिसेंबर २०१८ रोजी झाला. कारचे पहिले दोन नंबर तिच्या जन्म दिनांकावरुन घेतले आहेत. तर, २०२४ मध्ये रोहित आणि रितिका मुलगा झाला. रोहितच्या मुलाचा जन्म १५ नोव्हेंबर रोजी झाला. कारचे शेवटचे दोन नंबर मुलाच्या जन्मतारखेवरुन घेतले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही नंबरची (३० + १५) बेरीज ४५ होते. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहित आहे की, हा रोहित शर्माचा जर्सी नंबर आहे.

या कारची किंमत किती?

रोहित शर्माने केशरी रंगाची लॅम्बोर्गिनी उरुस कार खरेदी केली आहे. तिचे इंजिन ६२० एचपी पॉवरचे असून ८०० एनएम टॉर्क जनरेट करते. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, भारतातील एक्स-शोरूम किंमत ४.५७ कोटी रुपये आहे. ही यायब्रिड एसयूव्ही इलेक्ट्रिक मोडमध्ये ६० किलोमीटरपर्यंत चालवता येते.

रोहित शर्माकडे या आलिशान गाड्या मर्सिडीज-बेंझ एस-क्लास - १.५० कोटी रुपयेरेंज रोव्हर एचएसई एलडब्ल्यूबी - २.८० कोटी रुपयेमर्सिडीज जीएलएस ४०० डी - १.२९ कोटी रुपयेबीएमडब्ल्यू एम५ - १.९९ कोटी रुपये

टॅग्स :रोहित शर्मालँबॉर्घिनीऑफ द फिल्डकार