रोहित शर्माप्रमाणे मधल्या फळीतील आणखी एक शिलेदार बनणार टीम इंडियाचा ओपनर, वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सुरूय तयारी

महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) रोहित शर्माला मधल्या फळीतून उचलून ओपनिंगला आणलं अन् त्यानंतर इतिहासच घडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 01:57 PM2021-10-12T13:57:59+5:302021-10-12T13:58:25+5:30

whatsapp join usJoin us
Like Rohit Sharma This Middle order batsman will become a successful opener for team India, See who is he | रोहित शर्माप्रमाणे मधल्या फळीतील आणखी एक शिलेदार बनणार टीम इंडियाचा ओपनर, वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सुरूय तयारी

रोहित शर्माप्रमाणे मधल्या फळीतील आणखी एक शिलेदार बनणार टीम इंडियाचा ओपनर, वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सुरूय तयारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) रोहित शर्माला मधल्या फळीतून उचलून ओपनिंगला आणलं अन् त्यानंतर इतिहासच घडला. टीम इंडिया यशस्वी सलामीवीर म्हणून आज हिटमॅनची ओळख झाली आहे. मधल्या फळीतील फलंदाज ते सलामीवीर हा फॉर्म्युला एवढा हिट झाला की आता टीम इंडियातील आणखी एक शिलेदाराचे असे प्रमोशन होऊ शकतं. टीम इंडियाच्या या फलंदाजाला ओपनरची जबाबदारी दिली, तर संघाची कामगिरी आणखी जबरदस्त होईल.  

रोहित शर्माप्रमाणेचरिषभ पंतला मधल्या फळीतून उचलून सलामीवीर बनवलं जाऊ शकतं. रिषभ पंत डावखुरा फलंदाज आहे आणि संघाला त्याचा फायदा होईल आणि प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी वाढू शकते. रिषभ पंतचं नेतृत्व कौशल्यही जबरदस्त आहे आणि त्याच्या  नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) आयपीएल २०२१त जबरदस्त कामगिरी केली आहे.  सलामीसह तो रोहितला कर्णधार पदाच्या दावेदारीतही टक्कर देऊ शकतो. 

रिषभ पंतमध्ये अनेकांना धोनीची झलक दिसले. २००७मध्ये धोनीकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्यात आलं आणि तो निर्णय योग्य ठरला. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं दोन वर्ल्ड कप ( २००७ ट्वेंटी-२० व २०११ वन डे) आणि २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. अन्य क्षेत्ररक्षकांपेक्षा यष्टिरक्षक सामना नीट वाचू शकतो. त्यामुळे रिषभकडेही अशीच जबाबदारी सोपवली जाऊ शकते.  रोहित ३४ वर्षांचा आहे आणि आगामी २०२३चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन काही निर्णय घेतले जाऊ शकतात.    

Web Title: Like Rohit Sharma This Middle order batsman will become a successful opener for team India, See who is he

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.