रोहितनं युजवेंद्र चहलचा उघडाबंब फोटो शेअर केला, अन्....

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यासाठी शनिवारी कसून सराव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 17:03 IST2019-02-23T17:01:46+5:302019-02-23T17:03:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rohit Sharma Mercilessly Trolls Yuzvendra Chahal | रोहितनं युजवेंद्र चहलचा उघडाबंब फोटो शेअर केला, अन्....

रोहितनं युजवेंद्र चहलचा उघडाबंब फोटो शेअर केला, अन्....

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यासाठी शनिवारी कसून सराव केला. महेंद्रसिंग धोनीनं नेट्समध्ये जोरदार फटकेबाजी केली. कर्णधार विराट कोहली, विजय शंकर, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, रोहित शर्मा यांनीही मैदानावर चांगलाच घाम गाळला. मैदानावर खेळाडूंमध्ये खेळीमेळीचं वातावरण होते. कॅप्टन कूल धोनी नेहमीप्रमाणे युवा खेळाडूंना अमुल्य मार्गदर्शन करताना दिसत होता. कोहलीही मस्तीच्या मुडमध्ये दिसत होता. मात्र, खरी मस्तीतर हिटमॅन रोहितनं केली. मैदानावर एकाग्रतेने सराव करणाऱ्या रोहितनं सोशल मीडियावर चहलची चांगलीच फिरकी घेतली. त्यानं चहलचा उघडाबंब फोटो शेअर केला अन् त्यानंतर नेटकऱ्यांनीही चहलची फिरकी घेण्यास सुरुवात केली. त्यात कुलदीप यादवचाही समावेश होता.




भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या पूर्वसंध्येला रोहितने ट्विटरवर चहलचा एक फोटो शेअर केला. त्यात चहल उघडाबंब आहे आणि रोहितने त्याला G.O.A.T. असे संबोधले आहे. 


भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवनेही या गमतीत उडी घेतली.


चहलनेही रोहितची ही फिरकी खिलाडूवृत्तीने घेतली आणि ट्विट केले. यावेळी त्याने रोहितचा डाव त्याच्यावरच उलटवला. 

Web Title: Rohit Sharma Mercilessly Trolls Yuzvendra Chahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.