Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शर्माने केलं आपल्या लेकीचं बारसं, नाव काय ठेवलं ते जाणून घ्या...

रोहितने थेट मुंबई गाठली ती आपल्या मुलीला भेटण्यासाठी. रोहित आपल्या लेकीचं नावही यावेळी ठेवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 15:14 IST

Open in App

मुंबई : भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांना 30 डिसेंबरला कन्यारत्न झालं होतं. रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असल्याने त्याला आपल्या मुलीला भेटता आलं नव्हतं. पण आता चौथ्या कसोटी सामन्यात खेळत नसल्यामुळे रोहितने थेट मुंबई गाठली ती आपल्या मुलीला भेटण्यासाठी. रोहित आपल्या लेकीचं नावही यावेळी ठेवलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याच्यासोबत एका मुलाखतीमध्ये रोहितने याबाबत माहिती दिली होती. लवकरच, मी बाप  होणार असल्याचं रोहितनं स्पष्ट केलं होतं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. अखेर, रोहितच्या घरी आज ही गुडन्यूज आली. त्यानुसार, रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रोहितने आपल्या लेकीचं नाव समायरा असं ठेवलं आहे.

 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई