रोहित यापुढे टी-२० खेळण्याची शक्यता कमीच

रोहितने १४८ टी-२० सामन्यात ४ शतकांसह १४०च्या स्ट्राइक रेटने ३,८५३ धावा केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:23 AM2023-11-23T04:23:13+5:302023-11-23T04:23:42+5:30

whatsapp join usJoin us
Rohit sharma is unlikely to play T20 anymore | रोहित यापुढे टी-२० खेळण्याची शक्यता कमीच

रोहित यापुढे टी-२० खेळण्याची शक्यता कमीच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली :  भारतीय कर्णधार रोहित शर्मा यापुढे टी-२० सामने खेळण्याची शक्यता कमीच आहे.  एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाआधी रोहितने टी-२० बाबत स्वत:च्या भविष्यावर चर्चा केली होती. नोव्हेंबर २०२२ला भारत टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यापासून रोहित एकही टी-२० सामना खेळला नाही. तेव्हापासून हार्दिक पांड्याने अनेकदा भारताचे नेतृत्व केले. 

रोहितने १४८ टी-२० सामन्यात ४ शतकांसह १४०च्या स्ट्राइक रेटने ३,८५३ धावा केल्या आहेत.  रोहितने टी-२०पासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केली असून, यासंदर्भात मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्याशी त्याची चर्चा झाली आहे. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ईशान किशन  आणि ऋतुराज गायकवाड हे युवा सलामीवीर अपयशी ठरल्यास बीसीसीआय रोहितला आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगृू शकेल.  कारकिर्दीच्या या टप्प्यावर तो दुखापतमुक्त राहू इच्छितो. डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात भारताला सात कसोटी सामने खेळायचे आहेत. २०२५ला डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना होईल.

Web Title: Rohit sharma is unlikely to play T20 anymore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.