Join us  

Asia Cup 2018 : रोहित शर्मा 'त्या' दिवशी बॅट्समन म्हणून जन्माला आला... पाहा हा व्हिडीओ

रोहित गोलंदाजाचा फलंदाज कसा बनला, हे तुम्हाला माहिती आहे का? रोहितला फलंदाज म्हणून घडवणारे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी खास लोकमतसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये हे रहस्य उलगडले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 4:43 PM

Open in App
ठळक मुद्देरोहित शर्मा 'त्या' दिवशी बॅट्समन म्हणून जन्माला आला...

मुंबई : रोहित शर्मा एक फलंदाज म्हणून जगप्रसिद्ध आहे. रोहितच्या नावावर तीन द्विशतकं आहेत, असा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. पण रोहित हा पूर्वी फलंदाज नव्हता. त्याने गोलंदाजीने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण रोहित गोलंदाजाचा फलंदाज कसा बनला, हे तुम्हाला माहिती आहे का? रोहितला फलंदाज म्हणून घडवणारे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी खास लोकमतसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये हे रहस्य उलगडले आहे.

लाड सर म्हणाले की, " 1999 साली मी रोहितला बघितलं. तेव्हा तो आमच्यासंघाविरुद्ध गोलंदाजी करत होता. सामन्यानंतर मी त्याला भेटलो आणि मी प्रक्षिशण देत असलेल्या स्वामी विवेकानंद शाळेत त्याचे अॅडमिशन करून दिले. पहिल्या वर्षी तो गोलंदाज म्हणूनच खेळला. त्यावेळी तो सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. "

रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी केलेली खास बातचीत पाहा

 

रोहित शर्मा 'त्या' दिवशी बॅट्समन म्हणून जन्माला आला."पुढच्या वर्षी मी नेट्समध्ये शिरताना एक जण चांगली फलंदाजी करत होता, पाहिलं तर तो रोहित होता. बॅटवर तो चेंडू चांगल्यापद्धतीने घेत होता. सरळ बॅटने फटके मारत होता. तेव्हा त्याला जाऊन विचारलं, तू बॅटींग पण करतोस का? तो म्हणाला, हो सर. त्यावेळी त्याला विचारलं , मग हे तू मला सांगितलं का नाहीस? त्यावेळी त्याचं वय लहान होतं, तो थोडा बोलायला घाबरायचा. त्यानंतर त्याला पुन्हा मी बॅटींग करायला लावली. त्यावेळी त्याने एवढी सुंदर बॅटींग केली, की मी पाहतच बसलो. त्यावेळई रोहित शर्मा बॅट्समन म्हणून जन्माला आला, असे लाड सरांनी सांगितले.

रोहितने पहिल्याच सामन्यात फटकावल्या 140 धावा"दुसऱ्या वर्षी सामन्यापूर्वी त्याला विचारलं की तू ओपनिंग करशील का? त्यावेळी तो खूष झाला. कारण यापूर्वी तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. त्या पहिल्याच सामन्यात त्याने 140 धावांची खेळी केली. तेव्हा तो फलंदाज म्हणून उदयाला आला, असे लाड सरांनी सांगितले.

टॅग्स :रोहित शर्माभारतआशिया चषक