Join us

रोहित शर्माने असा फटका मारला की विराट कोहलीही झाला चकीत

नवव्या षटकात अशी एकच घटना घडली की ती पाहून कोहली चकीत झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 19:24 IST

Open in App
ठळक मुद्दे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने नाबाद 152 धावांची दमदार खेळी साकारली.

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने नाबाद 152 धावांची दमदार खेळी साकारली. रोहित आणि कर्णधार विराट कोहली या दोघांनीही शतके झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दोघांच्या द्विशतकी भागीदारीमुळेच भारताला आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवता आला.

वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा सलामीवीर शिखर धवन फक्त चार धावांमध्येच बाद झाला. पण त्यानंतर मात्र रोहित आणि विराट जोडीने दमदार फलंदाजी करत भारताचा विजय सुकर केला.

विराटने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली, तर रोहित संयतपणे फलंदाजी करत होता. पण नवव्या षटकात अशी एकच घटना घडली की ती पाहून कोहली चकीत झाला. नवव्या षटकातील केमार रोचच्या चेंडूवर रोहितने लेग साईडला फटका मारून चौकार वसूल केला. हा फटका रोहित फक्त पाहतच बसला.

हा पाहा रोहितचा तो खास फटका

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहली